“प्रयत्न करूनहि काम नाहीं. काम करावें तर पैसे नाहीत. पैसे हवेत म्हटले तर, मिळतें तें कामहि मिळत नाहीं. फुकटचे शब्द, फुकटचा देखावा. खोटी नाटकें, थापा, फसवणूक, स्वत:चीसुद्धा. इथून तिथून नुसते खेटे घालत राहायचे. वणवण भटकायचें. न जेवता भरल्या पोटाचें नाटक करायचे. सगळ्यांना- स्वतःलासुद्धां फसवत राहायचें. किती दिवस? जुने चेहरे ओळखी विसरतात. नवे कुणी जवळ उभे करीत नाहींत. सगळे दिवसेंदिवस हातचे निसटते आहे. गंज चढतो आहे. निकामी व्हायला होते आहे. आणि इलाज चालत नाहीं. चीड येते एकेकदा आपलीच. उबग येतो पटते, पण नष्ट होता येत नाहीं. तेवढे बेफाम होता येत नाही. बेहोष होता येत नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .