नियोजन हा एक फार मोठा धडा रशियन राज्यक्रांतीनें जगाला शिकविला. बेकारीनिवारण व लोककल्याण ही जबाबदारी सरकारची आहे हे तत्त्व अमेरिकेत रूझवेल्टने स्वीकारलें. पण अमेरिकेनें सार्वराष्ट्रीय आर्थिक नियंत्रण हें तत्त्व म्हणून स्वीकारलेलें नाहीं. अनियोजित व अनियंत्रित चढाओढीनें नासाडी फार होते, बेकारी माजते व लोकांच्या उपयोगी वस्तु त्यांना मिळत नसता निरुपयोगी, अपायकारक व विशिष्टवर्गांच्या चैनीच्या वस्तुच मिळत राहतात. पण अमेरिकेंत नासाडी करण्याला धन आणि धनसाधनें विपुल आहेत. म्हणून अमेरिकन सरकार सार्वराष्ट्रीय नियोजनाचें तत्त्व स्वीकारीत नाहीं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .