बाबूरावांनीं गांवच्या म्युनिसिपालिटींत निवडून येण्याचा चंग बांधला. त्या वेळपर्यंत ते काँग्रेसवाले होते. पण काँग्रेसकडून त्यांना निवडणुकीचें तिकिट मिळेना. झालें ! एका रात्रींत बाबूरावांचे मत ( आणि त्याबरोबरच टोपी) परिवर्तन झालें. " पांढरी टोपी चढवायची म्हणजे डोक्याचा डोकं म्हणून उपयोग न करतां खुंटी म्हणून उपयोग करण्यासारखं आहे ! " असें म्हणून त्यांनी तत्काळ भगवी टोपी चढवली. आमचे गल्लीवाले म्हणाले, “बाबूरावांनी आजूबाजूची वस्ती पाहून ही टोपी चढवलीय् ! पण यांत कांहीं तथ्य नसावें. कारण प्रत्यक्ष बाबूराव म्हणतात कीं, " काँग्रेसशी आपला प्रामाणिक मतभेद झाला ! "
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .

















