पण ह्याच गोष्टीबरोबर तितकीच महत्वाची आणखी एक गोष्ट करण्यास इंग्लंडचे कारखानदार लोक विसरले. ती गोष्ट ह्मणजे आपल्या कारखान्यांत काम करणाऱ्या मजूर वर्गाचें आत्यंतिक हित ही होय. “मजूर लोकांचें हित तेंच आपलें हित " ह्या महत्वाच्या तत्वाकडें कारखानदार लोकांचें जावें तितकें लक्ष गेलें नाहीं. इंग्लंडांतील तत्कालीन अर्थशास्त्रज्ञांमध्यें ज्या त्या वर्गानें फक्त आपापलेंच हित पहावें " हें मत प्रतिपादन करणाऱ्या लोकांचा एक गट होता. ह्या दिसण्यांत फायदेशीर पण परिणामी घातक ठरणाऱ्या मताचा पगडा कारखानदार लोकांवर बराच बसला. व आत्मविहीन परंतु वास्तविक पाहिलें असतां आपलाच असा जो मजूरवर्ग त्याचे कल्याणाकडे ह्या कारखानदार लोकांनी अगदींच कानाडोळा केला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .