कार्ल मार्क्सच्या हयातीत व त्याच्या हयातीनंतरहि रशियन राज्यक्रांतीपर्यंत त्याच्या लिखाणाचा अभ्यास फारच थोडा झालेला होता. भारतासारख्या देशांत एकाहि विद्वानाला त्याचें नांव, त्याची शिकवण माहीत नव्हती. अर्थशास्त्राच्या इतिहासावरील पाश्चात्य ग्रंथांत मार्क्सचा तुरळक उल्लेख असला तर असे. मोर्ले हा ब्रिटिश लेखक अतिशय विद्वान असून सतराव्या, अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील अनेक थोर पुरुषांचीं चरित्रे त्यानें लिहिलीं आहेत. मोर्लेचें ग्लॅडस्टनचें चरित्र प्रसिद्ध आहे. पण मोर्लेच्या वाङ्मयांत मार्क्सचा उल्लेखहि नाहीं. मार्क्सचें बहुतेक आयुष्य इंग्लंडांत गेलें असून इंग्लंडात व अमेरिकेंत त्यांचें लेखन प्रसिद्ध होत होतें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .