लेखकही अखेर माणसेच असतात आणि माणसांच्या स्वभावातले सारे गुणदोष त्यांच्यांतही असतात हे ह्या लेखांत मोठ्या मार्मिकतेने दाखविले आहे. लेखक-पत्नींचाही उपयोग चांगला केला आहे. “लेखकांच्या साहित्याशी अतिशय निगडित असलेल्या रद्दीवाल्यांनीहि या वसाहतींत घरांसाठी अर्ज केले होते, पण ते फेटाळले गेले. मात्र त्यांना रद्दीसाठी या वसाहतींत गोडाऊन्स बांधण्याची सवलत देण्यांत आली" गडकरी हे नाटककारच नव्हते आणि हरिभाऊ आपटे हे फालतू लेखक होते अशी परखड टीका करणारे हे साहित्यिक मेळे तपासण्याच्या समितीवर वर्णी लागावी... या व यासारख्या एकेका वाक्यांत फार 'मोठा' आशय मंत्री व्यक्त करून जातात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .