आणि त्याच्या डोळ्यांपुढें तो प्रसंग उभा राहिला. दुपारची वेळ होती. ययाति उपवनांत विहार करीत होता. विहार करतां करतां तृषेनें व्याकुळ होऊन जवळच असलेल्या एक पर्णकुटींत तो शिरला. तेथें असलेल्या नवयौवनेचें रूप पाहून तो थक्क होऊन गेला. देवयानीबरोबर आलेल्या या तरुण राजकन्येकडे आजवर ययातीनें कधीं धड पाहिलेलेंहि नव्हतें. आज पर्णकुटीतल्या या शीतल, मादक एकान्तांत त्यानें तिला अगदीं जवळून निरखलें आणि तो स्तिमित होऊन गेला. सोनचाफ्याचें टपोरें पूर्णविकसित पुष्प असावें तशी ही राजकन्या वाटत होती. तिच्या राजस, सुंदर मुखावर संकोच अन् अधीरेपणा या परस्परविरोधी भावनांचा नाच चालला होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
2 आठवड्या पूर्वीछान