कन्हाय, ग्रॅम पोलॉक, डेक्स्टर आणि ओ'नील यांच्याविषयीं योग्य तो आदर ठेवून असं म्हणावंसं वाटतं कीं, सोबर्स हाच आजचा सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. सोबर्सला गोलंदाजी करण्याची हौस असलेला गोलंदाज पृथ्वीतलावर तरी नाहीं. पुस्तकांतील सर्व फटके तर तो लीलेनं मारतोच, पण स्वतःचे कांहीं खास फटकेहि ठोकीत असतो. नाजुक कट्स् नि ग्लान्सेस् सफाईनं मारणारा सोबर्स हुक्स, पुल्स आणि ड्राइव्हज् मात्र सणसणीत मारतो. डावाच्या अगदी सुरुवातीपासून तो फटकेबाजी सुरू करतो. Attack is the best kind of defence हें त्याच्या फलंदाजीचं ब्रीदवाक्य आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .