इंग्लंडचा एक दौरा खेळाडूंत किती सुधारणा घडवून आणूं शकतो हें सोबर्सनं ५८ साली वेस्ट इंडीजमध्ये आलेल्या पाकिस्तानी संघाला दाखवून दिलं. किंग्जटन येथे ३६५ (नाबाद) धांवा काढून सोबर्सनं हटनचा ३६४ धांवांचा विक्रम मोडला. वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यानं सर्वोच्च धांवा काढण्याचा हा जागतिक विक्रम केला. पुढच्याच कसोटी सामन्यांत १२५ व १०९ (नाबाद) धांवा काढून दोन्ही डावांत शतकं फडकवणाऱ्या मोजक्या फलंदाजांच्या यादीत आपलंहि नांव नोंदवलं. पांच सामन्यांत आठ वेळा खेळून त्यानं ८२४ धांवा काढल्या. म्हणजे प्रत्येक खेळींत सरासरी १३७.३३ धांवा ठोकल्या. 'विक्रमी फलंदाज ' ही उपाधि त्यानं भारतांत सार्थ करून दाखवली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .