समजदार रसिकांची ही खुषी नसते. ज्यांना गाण्यातलं कांहीं कळत नाहीं परंतु रसिक शौकीन आहोंत अशी बतावणी करायची असते त्यांची ही खुषी असते. त्यांना आनंद होत नसतो. संगीतकलेचा खरा आनंद कशांत आहे याची दादच त्यांना नसते. परंतु आनंदाचं नाटक करून दर्दीपणा त्यांना मिरवायचा असतो. गंधर्वांच्या गाण्याला आलेले एक नामांकित नट जेव्हां डोळे मिटून माना हिसडूं लागले व 'वाहवा' 'वाहवा' म्हणू लागले तेव्हां माझ्या मनांत आलं, 'अरे यांना गाणं इतकं केव्हां कळू लागलं ? गाण्याची आवड वाढली आहे खचित!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .