थोडयाच दिवसांपूर्वी एका गंधर्वाची मैफल ऐकण्याचा योग आला. त्यांचा सत्कार होता म्हणून मुद्दाम वर्गणी भरून गेलों. त्यांच्या चाहत्यांनी आधीं मजजवळ त्यांची पराकोटीची तारीफ केली होती. "He is a genius!” असा उद्गार पुनः पुन्हां ऐकला होता. प्राध्यापक आणि सिनेनट-दिग्दर्शक या दोन्हीं पेशांचीं वस्त्रं साथीप्रमाणें आलटून पालटून धारण करणाऱ्या एका साहित्यिक 'अंमलदारांनी या गंधर्वांच्या एका सत्कार सभेत असे उद्गार काढल्याचं ऐकलं होतं की " हे एक ईश्वरी अवतार आहेत! भारतीय संगीताच्या उत्थापनाचं कार्य कोणाच्या हातून होणार असेल तर यांच्याच ! ईश्वराला आपण एकेरी नांवानंच हांक मारतों. त्याच अभिप्रायानं मी या कलावंताला अरे तुरे म्हणतो!" वगैरे वगैरे !
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .