संगीताचा चालू जमाना मोठा चमत्कारिक दिसतो. “आपल्याला लोकाश्रयावर जगायचं आहे हें कलावंतांनी लक्षांत घ्यावं" असा उपदेश सभा-समारंभांतून व्यासपीठ गाजविणारे शिष्ट वक्ते गायक वादकांना करीत असतात. हा उपदेश चुकीचा नाहीं. पण व्यर्थ आहे. कारण कलावंतांनी ती गोष्ट आधींच पुरती ओळखलेली आहे. इतकी की गायन वादनाची विद्या अंगी बेताचीच असली तरी चालेल, लोक मात्र अधिकाधिक गोळा केले पाहिजेत व झुलविले पाहिजेत या धोरणानंच कलावंत वागत आहेत. आपला एक स्वतंत्र गट निर्माण करायचा, भक्त मंडळी वाढवावयाची, आपण ज्या सभेत गाऊं अगर वाजवूं त्या सभेंत माना डोलविणारांची व 'वाहवा'चा पाऊस पाडणारांची संख्या अधिकाधिक कशी होईल तें पहावयाचं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .