माझ्याबरोबर माझी आई नेहमीच स्टुडिओत येत असे. पण एकदा ती आजारी पडली तेव्हा मला स्टूडिओत कोणी घेऊन जावयाचे हा प्रश्न निर्माण झाला. माझ्याच स्टुडिओत काम करणारी एक सुप्रसिद्ध नटी त्या वेळी माझ्या आईच्या परिचयाची होती. मला स्टुडिओत दररोज घेऊन जाण्यविषयीं आईनें तिला सांगितलें. त्याप्रमाणें ती रोज मला नेऊ लागली. दररोज सकाळी आपली गाडी घेऊन ती माझ्या घरी येई. आणि त्याच गाडींतून आपल्याबरोबर मला ती स्टुडिओत घेऊन जाई. पण ती मला वागणूक मात्र अशी अपमानास्पद देई की, त्यामुळे मला जीव अगदी नकोसा होई.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .