‘वाचक बना लेखक’ स्पर्धेविषयी थोडेसे . . .

सभासदत्वासंबंधी वाचकांशी बोलताना बऱ्याच जणांनी आमचे पण लेख पुनश्च वर घेणार का? अशी विचारणा केली. तेव्हा मला जाणवलं की हल्ली लोक लिखित स्वरुपात बऱ्यापैकी व्यक्त होऊ लागलेत. त्यांच्या या उर्जेला पुनश्च च्या format मध्ये वाव कसा द्यायचा हा प्रश्नच होता. शिवाय एखादा लेख वाचल्यावर अस्वस्थ होऊन किंवा त्याच्या उलट एखाद्या लेखामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळून काळ्यावर पांढरे करण्याची उर्मिसुद्धा अनेक…

मे महिन्याचे संपादकीय

प्रतिक्रिया-स्पर्धेचा निकाल आणि आगामी महिन्यात काय वाचाल . . . नमस्कार. या महिन्यापासून एक नवीन प्रथा सुरु करतोय. येत्या महिन्यात कोणते लेख आपल्या भेटीला येणारेत त्याबद्दल मी थोडसं लिहून महिन्याच्या सुरुवातीला टाकाव असं ठरतंय. या निर्णयाची पार्श्वभूमी सांगतो.

नवीन वर्षात नवीन काय भाग १

नमस्कार. पुनश्च ची कल्पना आमचे मित्र आणि website/app या क्षेत्रातील माहीर विनय सामंत यांच्याकडे बोललो तेव्हा लगेच त्यांनी ती उचलून धरली कारण त्यांच्यामते पुनश्च हे मराठीतील पहिलेच सशुल्क डिजिटल नियतकालिक असणार होते. त्यानुसार ते 'पहिलेपण' पुनश्चने मिळवलं आणि मिरवलंदेखील. पहिल्या तीन महिन्यातच हजार downloads चा टप्पा गाठून पुनश्चने अनेकांचे अंदाज चुकवले. या वर्षाची सुरुवातदेखील पुनश्च अशीच जोरदार करीत आहे. मराठीत…

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार, वाचकहो. हा हा म्हणता ३१ डिसेंबर झाला आणि १ तारीख उजाडली.  २०१७ साल संपलं आणि पुनश्च सुद्धा ३ महिन्याचं झालं. मराठी भाषेसाठी, साहित्यासाठी आणि पर्यायाने मराठी समाजासाठी काहीतरी करायचं बरेच दिवस मनात होतं. 'पुनश्च'च्या रूपाने ते यावर्षी साकार झाल्याचं समाधान आहे. या काळात आपण सशुल्कचे ३० आणि अवांतरचे ८१ असे मिळून १११ लेख प्रसारित केले. मला आशा आहे की सगळे जरी नाही तरी त्यातले बरेचसे तुम्ही वाचले असणार.. या तीन महिन्यात  मराठी साहित्याचे प्रकाशक, लेखक, श्याम जोशीसरांसारखे ग्रंथालय क्षेत्रातले दिग्गज अशा खूप साऱ्यांशी परिचय झाला. तुमच्यासारख्या हजारो सुजाण, चोखंदळ वाचकांच्या संपर्कात आलो. २०१७ साल या अर्थाने मला खूपच समृद्ध करून गेले.

दुसरे आवर्तन पूर्ण झाल्याच्या निमित्ताने

नमस्कार. कालच्या रविप्रकाश कुलकर्णींच्या लेखाबरोबर आपले #पुनश्च चे दुसरे आवर्तन पूर्ण झाले. म्हणजे आजवर आपण एकूण १६ लेख प्रसिद्ध केले. प्रत्येकाने मनातल्या मनात आपण यातले किती वाचले याचं गणित मांडलं असेलच. काश! मला तो आकडा समजता..:-) आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखांचा १६ हा आकडा वाचकांच्या आवडीनिवडीचा अंदाज यायला कमी आहे. हा आकडा पुरेसा असता तर माझे हात एखादा वाचक सर्व्हे करण्यासाठी…

जरा इकडे लक्ष द्या. . .

#पुनश्च च्या ८ लेखांचे पहिले आवर्तन झाले. या पहिल्या आवर्तनात आपण अंतर्नाद मासिकातले दोन लेख; एक अनुभव आणि एक कथा, आरोग्यसंस्कार मासिकातले दोन लेख; एक कविता रसास्वाद आणि एक अर्थकारण याविषयावरचा, एक भवताल मासिकातला चिंतन या सदराखाली , एक कालनिर्णयचा मराठी भाषेसंदर्भातला  आणि एक विचित्रविश्व मधला व्यक्तिचित्रण करणारा असे मिळून ७ लेख पुनःप्रकाशित केले. ठरल्याप्रमाणे आठवा लेख  डॉ यश वेलणकरांचा…

  • 1
  • 2