डॉ.अमरापूरकर आणि एन्डोस्कोपी

वर्ष दोन वर्षांपूर्वी... दक्षिण मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात, एका वैद्यकीय परिषदेत डॉ.अमरापूरकर सांगत होते, "मित्रहो,आता तंत्रज्ञान अधिक पुढं गेलंय, एंडोस्कोपीच्या पुढं आलीये आता 'कॅप्सूल एन्डोस्कोपी' …म्हणजे एंडोस्कोप तोंडाद्वारे पोटापर्यंत आता सरकावण्याची गरज नाही.." "काही एम.एम.डायमीटर असलेली एक कॅप्सूल फक्त गिळायची.. हो फक्त गिळायची... ती प्रवास करेल, अन्ननलिकेतून जठरात, जठरातून छोट्या आतड्यात, मोठ्या आतड्यात आणि थेट गुदद्वारापर्यंत..." "मुख्य म्हणजे कॅप्सूल मध्ये असेल एक कॅमेरा, जो छायांकित करेल पोटाच्या आतलं सारं गौडबंगाल घेईल फोटो…

भावेश भाटिया – आकांक्षा पुढती गगन ठेंगणे

२०१० मध्ये मी, माझी पत्नी सोहिनी व मुलगा अपार सातारा येथे एका कार्यक्रमा निमित्त गेलेलो होतो. एक दिवस थोडा मोकळा होता व अपारची महाबळेश्वर बघण्याची तीव्र इच्छा होती, म्हणून आम्ही सकाळीच साताऱ्याहून निघालो. महाबळेश्वरमध्ये प्रवेश करण्याच्या रस्त्यावरच भावेश भाटिया यांचे मेणबत्ती बनविण्याचे वर्कशॉप आहे; तिथे १०-१५ मिनिटांसाठी जाऊ व नंतर पॉईंट्स बघायला जाऊ म्हणून गेलो. भावेश या अतिशय गोड व्यक्तिमत्वाच्या…

वेडा…

मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो... तपासुन घेण्यासाठी, औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकर्यांची झुंबड .... सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात, तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले... बसणं ताठ, नाक तरतरीत आणि सरळ, घारुळे डोळे, अंगावर साधे पण स्वच्छ कपडे. बराच वेळ मी तिरक्या नजरेने पहात होतो, हे भिक्षेकरी नक्कीच नव्हेत! सहज दिसलं, उजव्या घोट्यापासुन पाय नव्हता त्यांना, बाजुलाच कुबडी टेकवुन ठेवली होती. थोड्या…

मुर्खांची लक्षणे!

समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात काही मुर्खांची लक्षणे सांगितली होती, काही सांगायाचे राहुन गेले होते.... 👇🏼👇🏼 चालत्या वाहनावरी, हेडफोन कानी धरी गाणी ऐकत जाय घरी, तो एक मूर्ख || रुग्णालयी वा सभागारी, सूचना असली तरी मोबाईल बंद न करी, तो एक मूर्ख || कामधंदा कधी ना करी, अभ्यास व्यायाम ना करी रात्रंदिन फोन ज्याचे करी, तो एक मूर्ख || जिथे तिथे सेल्फी काढतो, श्र्लील अश्लील भेद न…

प्रदीप ताम्हाणे:-अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे उद्योजक

“आमच्या तंत्रज्ञानासाठी तुम्हां भारतीयांना आम्ही मागू तेवढे पैसे द्यावेच लागतील”. अमेरिकन बॉसचे ते शब्द प्रदीपच्या कानात शिसे ओतल्यासारखे ओतले गेले. माझ्या देशाला हा कमी लेखतोय या निव्वळ एका भावनेने त्या भारतीय तरुणाने उत्तम पगार, कार, अलिशान घर नोकरी दोन मिनिटात सोडली. या कंपनीचा प्रतिस्पर्धी म्हणून मी उभा राहिन असा मनाशी चंग बांधला. औषधी गोळ्यांना कलरकोटींग करणाऱ्या जगातील ‘त्या’ एकमेव कंपनीला…