जन्म : १३ ऑक्टोबर १९४४ - मृत्यू : ६ ऑगस्ट २०१५
विज्ञान विषयाचे अभ्यासक, विज्ञान कथा लेखक, स्तंभलेखक, कादंबरीकार. सायन्स टुडे या मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या '' दुसरा आईनस्टाईन'' या इंग्लिश अनुवादित कथेतून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या या कथेला कान्सास विद्यापीठाकडून सर्वोत्कृष्ट विज्ञान कथा म्हणून सन्मानीत करण्यात आले.


