या विज्ञान कथा खोट्याच ठरोत!


विज्ञानकथा लेखक लक्ष्मण लोंढे  यांनी केलेला हा एक अत्यंत वेधक साहित्यिक प्रयोग आहे. ‘२२ जुलै १९९५’ या शीर्षकाची कथा त्यांनी १९८१ साली लिहिली. म्हणजे केवळ १४ वर्षांनतरचा तो भविष्यकाळ होता. विज्ञानकथा लेखक सहसा एवढा नजिकचा भूतकाळ घेत नाहीत. प्रत्यक्षात १४ वर्षांनी जेंव्हा हा दिवस उगवला तेंव्हा काय झाले? ती कथा म्हटले तर खोटी ठरली, म्हटले तर नाही. परंतु  या निमित्ताने विज्ञानकथा आणि त्यांतील भविष्यवेध यावर लोंढे यांनी हा सुंदर लेख लिहिला. तो किर्लोस्करच्या ऑगस्ट १९९५च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. लक्ष्मण लोंढे (जन्म : १९४५; मृत्यू : ६ ऑगस्ट, २०१५) हे वित्तीय संस्थेत नोकरी करीत मात्र त्यांनी लेखक म्हणून विज्ञानकथांचा प्रांत निवडला. ‘पाण्यात राहणारा मासा’, ‘देवांसि जिवे मारिले’, ‘नव्या शतकाच्या उंबरठ्यावर’ ही व इतर अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. ********** अंक: किर्लोस्कर ऑगस्ट १९९५ ‘२२ जुलै १९९५’ ही मी लिहिलेली एक, मला आणि वाचकांना आवडलेली, विज्ञानकथा. ही कथा मी १९८१ साली लिहिली. ती ‘किर्लोस्कर’च्या हीरक महोत्सवी विशेषांकात प्रसिद्ध झाली. योगायोग असा की त्यावेळी ‘किर्लोस्कर’चे संपादक श्री. ह. मो. मराठे हे होते. मध्यंतरी अन्य काही नियतकालिकांमध्ये काम करून, पुन्हा प्रत्यक्ष २२ जुलै १९९५ लाही ह.मो.च किर्लोस्करच्या संपादकपदी आहेत! कथा प्रसिद्ध झाली. काही वाचकांची ती आवडल्याबद्दलची मला पत्रं आली. नंतर १९८४ साली ही कथा समाविष्ट असलेला माझा पहिला विज्ञानकथा संग्रह प्रकाशित झाला. या संग्रहाचं नावही मी ‘२२ जुलै १९९५’ हेच ठेवलं आहे. या संग्रहाला महाराष्ट्र शासनाच्या ललित विज्ञान विभागातला सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा साहित्य पुरस्कार मिळाला. अशी या कथ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


किर्लोस्कर , विज्ञान कथा , भाषा

प्रतिक्रिया

  1. arush

      5 वर्षांपूर्वी

    मूळ गोष्ट छोटी आणि फाफट पसारा जास्ती

  2. shripad

      5 वर्षांपूर्वी

    छान लेख. असे विज्ञानावरील अजून लेख वाचायला आवडतील.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts