भूगर्भांतून विहिरी खोदून तेल मिळविण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सर्वांआदरचे आहेत. सन १८५९ ला पेनसिलव्हिया संस्थानांत अशा प्रकारची पहिली विहीर खोदण्यांत आली. या विहिरीची खोली अवघी ७० फूट असून त्या कामी दोन हजार डॉलर्सच्यावर भांडवल खर्च झालेले नव्हते. प्रथमतः अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत उत्पन्न होणारे या काळांतील तेल घरगुती जळणाकडे उपयोगिले जात असे. ही स्थिती लवकरच पालटून दहा वर्षांत केरोसिन सर्व जगभर प्रसार पावून त्याचा दिवे—जाळणीकरितां उपयोग करण्यात येऊ लागला. तसेच खाणींतून निघणारे काळें क्रूड ऑईल यापासूनच निरनिराळ्या प्रकारची व जातीची तेले निर्माण करण्यांत येऊ लागली.
यांत्रिकयुगाच्या वाढीबरोबरच तेलाची वाढ झालेली आढळून येते. तेलाची वाढ झाली नसती तर यांत्रिकयुगाची वाढ झाली असती की नाही याची शंकाच आहे. यांत्रिकयुगांतच वाहतुकीच्या निरनिराळ्या साधनांकरिता उपयुक्तता व काटकसर यांच्या दृष्टीने तेल वापरणे जसजसे फायदेशीर आहे असे आढळून आले तसतसा त्याचा प्रसार व ताबा या गोष्टी राष्ट्रीय स्वरूपाच्या बनूं लागल्या. अवघ्या सत्तर वर्षांच्या अवधींत या धंद्यांत ‘न भूतो न भविष्यती’ अशी क्रांती झालेली आहे. यांत्रिकयुगाच्या मागोमागच महायुद्ध आले व या धंद्यास पूर्वीपेक्षा शतपटीने महत्त्व प्राप्त झाले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .