सुलेमान व जयसिंह शुजाचे पाठलागावर असतां औरंगजेब व मुराद आपापल्या ठिकाणाहून फौजा घेऊन निघाले ते माळव्यांत एकत्र झाले. पहिल्याच भेटींत औरंगजेबाने हत्तीवरून उतरून मुरादपुढे साष्टांग नमस्कार घालून त्याची खात्री केली कीं, मी तुम्हास राज्यपद मिळवून देऊन मी केवळ मक्केची जोड मिळविणार. राज्याची दगदग मला बिलकूल नको. तेव्हांपासून मुराद बादशाही थाटानें राहून औरंगजेब त्याचे हुकूम झेलूं लागला. हीं वर्तमाने एकून शहाजहान व दारा भयभीत झाले. त्यांनी घाईघाईनें फौजांची जमवाजमव करून आपले भरवंशाचे सरदार कासीमखान व जशवंतसिंह यांस औरंगजेब व मुराद यांजवर रवाना केले. परंतु कासीमखान सुनी पंथाचा अभिमानी औरंगजेबाशी लढला नाहीं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .