आरंभापासूनच दाराविषयीं औरंगजेबाचें अंतःकरण शुद्ध नव्हते. त्यांत बापाने पुरवलेले दाराचे लाड व धर्माच्या बाबतीत त्याने स्वीकारलेले अकबराचे धोरण यांच्या योगानें औरंगजेबाचे मनांत या वडील बंधूसंबंधाने भयंकर द्वेष वागूं लागला होता. सर्वात धाकटा बंधु मुराद नुसता धटिंगण व खाण्यापिण्याचा शोकी असून गुजराथच्या कारभारावर होता. मुराद यास स्वतःची विचारशक्ति बिलकूल नव्हती. शहाजहान आजारी पडण्यापूर्वीच औरंगजेब व मुराद या दोघां बंधूंची गुप्त खलबतें व गुप्त पत्रव्यवहार चालू झाले होते. दरबारातील खडानखडा बातमी रोशनारा व सर्वांत धाकटी बहीण गोहरा या औरंगजेब व मुराद यांस दिल्लीहून तिखटमीट लावून वरचेवर कळवीत असत,
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .