मोगल बादशहा म्हणजे सर्वाधिकारांचें केंद्र होय. लहानापासून थोरापर्यंत कोणतेंहि काम बादशाहाचे हुकमाशिवाय सिद्धीस जात नसे. अशा स्थितींत दारास सर्वाधिकार प्राप्ति झाल्यापासून दरबारांत दोन विरोधी पक्ष उपस्थित झाले. एक पक्ष दाराचा व दुसरा धूर्त वजीर सादुल्लाखान याचा. दारा भोळसट व वजीर कावेबाज, यामुळे दोघांत सडकून वैमनस्य उत्पन्न झालें. आणि त्याचें निराकरण शहाजहानकडून होईना. वजीर सुनीं पंथाचा पक्का कैवारी अर्थात् त्याचा अंतस्थ ओढा औरंगजेबाकडे असून दारा केवळ धर्मभ्रष्ट आहे असें त्यास वाटू लागलें. दाराला विषप्रयोग करून वजीर ठार मारणार अशीसुद्धां भूमका उठली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .