झाडावर किंवा झाडाखाली आसरा घेणाऱ्या आदिमानवाने त्याच झाडाची चार लाकडे रोवून त्यावर झाडांची पाने पसरून उभारलेला चार भिंतींचा आडोसा ही पहिली वास्तू असावी. गरजेतून निर्माण झालेल्या वास्तूबांधणीचे काळाच्या ओघात शास्त्र झाले आणि संस्कृतीच्या विकासकालात त्या शास्त्राची कला झाली. या कलेला त्या त्या परिसरातील हवामान, गरजा, उपलब्ध वस्तू, धार्मिक चिन्हे आणि कलाकुसरीच्या पद्धती यातून एक ओळख मिळाली. मनुष्याचा संचार भौगोलिक सीमा ओलांडून सर्वत्र होऊ लागला, आक्रमण करून इतरांच्या भूप्रदेशाचा ताबा घेतला जाऊ लागला तेव्हा भाषा, खाद्यसंस्कृती, पोषाख या सोबतच वास्तूकलाही संमिश्र होऊ लागली. इतिहासाच्या झरोक्यातून वास्तूशैलीकडे पाहत मराठी किंवा मराठा वास्तुकलेच्या अंगाने हे सगळे बदल टिपणारा हा अत्यंत मनोरम आणि रंजक असा लेख- ********** (अंकः किर्लोस्कर – एप्रिल १९९५) फार फार प्राचीन काळी, मानवाची गणना जगातील वैचारिक पातळी गृहीत धरता, इतर प्राण्यांपेक्षा वरच्या श्रेणीत होऊ लागली. त्यावेळी, झाडाखाली बसून उन्हापावसापासून आपले संरक्षण करण्याऐवजी, त्याने फांद्यापानांचाच कृत्रिम आडोसा तयार केला. जगात तयार झालेली ही पहिली वास्तू. हळूहळू काळाच्या ओघात मानव अधिक प्रगत झाला. तशी वास्तुबांधणीतही सफाई आली. संपूर्ण जगभर, जिथे जमीन आहे तिथे मानवाने वेगवेगळ्या रूपातल्या वस्तू तयार केल्या. त्यात आपली वैशिष्ट्ये तयार केली. नवनवीन पद्धती आचरणात आणल्या. प्रत्येक ठिकाणी तिथल्या नैसर्गिक उपलब्ध साधनांचा उपयोग केला. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीप्रमाणे वास्तुबांधणीत बहुभिन्नता आली. त्यातच पुढे, वास्तुरचनेत होत गेलेले सुलभ बदल, लागलेले शोध आणि नवीन साधन सामुग्रीची उपलब्ध ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .