पं. अरविंद गजेंद्रगडकरः सूर आणि साहित्य यांना जोडणारा सेतू

पुनश्च    भानू काळे    2020-06-10 06:00:34   

अंक : अंतर्नाद जुलै २०१० ही घटना आहे १९९५ मधली. काही ओळखीच्या वाचनप्रेमींना आणि ‘प्रकाशन डायरी’ या वार्षिकातून निवडलेल्या काही लेखकांना ‘अंतर्नाद’चा पहिलाच अंक आधल्या आठवड्यात नमुना म्हणून रवाना झाला होता. या उपक्रमाला वाचकांचा काय प्रतिसाद मिळतो हे जाणून घ्यायची उत्सुकता मनात होती. हळूहळू प्रतिक्रियांची पत्रे येऊ लागली. त्यांतल्याच एका काहीशा थरथरत्या हातांनी लिहिल्यासारख्या वाटणाऱ्या, मोठमोठ्या अक्षरातील पत्राने लक्ष वेधून घेतलेः “...हल्ली कोणतंही मासिक वाचावंसं तर सोडाच, पण हातातही धरवत नाही. पण ‘अंतर्नाद’नं अपेक्षा वाढवल्या. ‘यशवंत जयवंत’ आणि ‘महात्मादेखील माणूस असतो’ हे लेख फार आवडले. हरिलाल मोसंबं घेऊन बांना भेटतो त्या प्रसंगानं तर डोळ्यात पाणी आलं. हल्ली असा अनुभव विरळाच झाला आहे. बरेच दिवस माझी लेखणी अबोल होती. ‘अंतर्नाद’ वाचून पुन्हा लेखनाची ऊर्मी आली आहे.” खाली सही होती. ‘पं. अरविंद गजेंद्रगडकर’ पत्र वाचून समाधान वाटले. एखाद्या लेखकाची निद्रिस्त प्रतिभा जागृत व्हायला प्रेरणा ठरणे हे कुठल्याही मासिकाच्या पहिल्या अंकाचे भाग्यच म्हणायचे. दोन-तीन महिने लोटले आणि एक दिवस एक जाडजूड लिफाफा हाती आला. तेच एकदा परिचित झालेले ढबोले अक्षर; ओळी नसलेल्या साध्या न्यूजप्रिंटवर, भरभरून व वाचकांशी एक प्रकारची जवळीक गृहीत धरणाऱ्या शैलीत लिहिलेला मजकूर. लेखाचे शीर्षक होते, ‘गावं असं! जगावं असं!’. कुमार गंधर्वांवरचा तो लेख वाचायला सुरुवात केली आणि मग लेख पूर्ण झाल्यावरच पुढचा लिफाफा उघडला. लेख आवडला आणि ‘अंतर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


व्यक्ती विशेष , संगीत जगत

प्रतिक्रिया

  1. mailimaye@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    Sundar !!!!!

  2. Suhas Bartakke

      5 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख .पंडितजींच्या मृत्यूनंतर वर्तमानपत्रात फारसे लेख आलेच नाहीत.मी एका दिवाळी अंकात त्यांच्यावर लिहिलं होतं.

  3. mukunddeshpande6958@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    छान

  4. mukunddeshpande6958@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    अतिशय छान लेख आहे

  5. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    नुकताच भानू काळे यांनी लिहिलेला पंडित अरविंद गजेंद्रगडकर यांच्या वरील लेख वाचला .आवडला .सध्या अरविंद गजेंद्रगडकर यांचं 'असे सूर अशी माणसं ' हे पुस्तक मी वाचतो आहे . आणि योगायोगाने लेखकाबद्दल विस्तृत माहिती देणारा भानू काळे यांचा लेख वाचल्यामुळे मला तो आवडला ' एवढेच नव्हे तर लेखकाची लेखनशैली 'लेखकाचं संगीत क्षेत्रातील विश्व उलगडत गेले . अंतर्नाद मध्ये यापूर्वी वेळोवेळी त्यांचे काही लेख मी वाचले होते .मला स्वतःला शास्त्रीय संगीतातील काही समजत नाही पण सुश्राव्य आणि सुगम संगीत ऐकण्याचा कान बऱ्यापैकी तयार केला आहे .त्यातही गजेंद्रगडकर यांची लेखन शैली अतिशय रसाळ आणि प्रसंगाचा परिपोष करणारी असल्यामुळे सहजतेने वाचन होत जातं . आणि मागील काही वर्षातील सामाजिक ' संस्कृतिक कलात्मक जीवन त्यावेळेस आकाशवाणीला असलेले महत्त्व समजावून घेता येतं . शिवाय कला क्षेत्रातील महान व्यक्तींचे स्वभाव त्यांचे गुणदोष समजून येतात . अंतर्नाद या मासिकाचे साधारण ९३-९४ साला पासूनचे तर अगदी अलीकडे मासिक बंद पडण्या पर्यंतचे सर्व अंक वाचनालयातून मी मिळवून वाचलेले आहेत . त्यातील अरविंद गजेंद्रगडकर यांचे खूप सारे लेख स्वतंत्र वाचले होते . भानू काळे यांचं बदलता भारत हे पुस्तक देखील वाचनामध्ये आल्यामुळे साहित्यातील समृद्ध असं बरंच काही वाचल्याच समाधानही मिळून जातं .ज्या वेळेला मी पुनश्यचा सदस्य झालो तेव्हा प्रथमतः सगळे लेख पाहिले त्या वेळेला अरविंद गजेंद्रगडकर यांचा चोरून ऐकलेल्या मैफिलींची मजा हा पहिला लेख मी वाचला होता . असो .लेख खरोखरच आवडला .



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts