अंक: अंतर्नाद ,मे २०१२ मराठी माणूस नाटकवेडा असतो, तो जाईल तिथे एखादी संस्था स्थापन करुन सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करतो अशी मराठी माणसाची बरीच लक्षणे सांगितली जातात. मात्र तरीही मराठीपण म्हणजे नेमकं काय, असं कोणी विचारलं तर आपल्याला त्याचं निश्चित असं काही उत्तर देता येत नाही. शिवाय अनेक गोष्टी काळाच्या ओघात बदलतही असतात. आचार्य अत्रे यांनी 'कऱ्हेचे पाणी'च्या पाचव्या खंडात 'मराठीपण म्हणजे काय' अशा शीर्षकाचा एक लेख लिहिला आहे. त्यात इतिहासातले अनेक दाखले देत त्यांनी प्राचिन काळापासून अनेकांनी मराठी लोकांविषयी काय काय लिहून ठेवले आहेत, त्याची रंजक उदाहरणेही दिली आहेत. त्यात त्यांनी न्या.रानडे यांचेही मत दिले आहे. त्यात एक वाक्य असे आहे- 'धर्माचे आग्रही स्वरूप महाराष्ट्रात आढळून येत नाही. धर्माबाबत उदासिनपणा हा या महाराष्ट्राचा विशेष गुण आहे.' रानड्यांनी ह्यांस 'गुण' म्हटले होते हे लक्षात घ्या. आज तशी परिस्थिती राहिली आहे का? मराठीपण म्हणजे नेमकं काय याचा उहापोह करणारा, या महिन्याच्या चिंतन सदरातील हा लेख नुकत्याच साजऱ्या झालेल्या ६० व्या महाराष्ट्र दिनाच्या त्यानिमित्ताने. अंतर्नादच्या 'मे २०१२' च्या अंकात तो प्रसिद्ध झाला होता. ********** मराठीपण म्हणजे नेमके काय, ती टिकवता येणारी गोष्ट आहे, का सतत बदलणारी, आणि ते टिकवायचे असेल तर कसे? मराठीपण हा शब्दच मराठी भाषेशी आणि मराठी भाषकांशी जोडला गेला असल्याने मराठीपण हे केवळ भाषेशी जोडले गेले आहे, का मराठी प्रदेशात राहणाऱ्या माणसांच्या स्वभाव वैशिष्ट्यांशी, मनोवृत्तीशी आणि वागण्याच्या जीवनपद्धतींशी? मला स्वत:ला असे वाटते, की मराठीऐवजी या मुलखाची भाषा जरी प ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
rohanjagtap
5 वर्षांपूर्वीभारत हा एक उपखंड आहे. मध्यंतरीच्या काळात काही आर्थिक आणि सामाजिक कारणांनी महाराष्ट्रीयत्त्वाकडून भारतीयत्त्वाकडे वाटचाल सुरू असली, तरी भविष्यात पुन्हा आर्थिक आणि सामाजिक कारणांनी ही वाटचाल भारतीयत्त्वाकडून महाराष्ट्रीयत्त्वाकडे सुरू होईल. यामागे तथाकथित संकुचिपणा नसेल, तर केवळ वस्तुनिष्ठता असेल. बाकी शिर्षकापासून लेख भरकटला आहे हे वेगळे सांगायला नको.
ajitpatankar
5 वर्षांपूर्वीही रड (का ओरड), पूर्वीपासूनच आहे.. पु.लं. च्या एक शून्य मी पुस्तकात मराठी माणसावरील लेख आहे.. तो आजही तंतोतंत लागू आहे... १९६७ सालच्या एक लेखात मराठी पुस्तके खपत नाहीत त्यामुळे प्रकाशन व्यवसाय धोक्यात असल्याचे नमूद केले आहे.. भाषेच्या बाबतीत म्हणायचे तर.. संगणकाद्वारे काम हे सर्वदूर पसरेपर्यंत, साहेबांच्या इंग्रजी भाषेत बोलणे हे उच्चभ्रूपणाचे लक्षण असे... फाडफाड इंग्रजी बोलणे कौतुकाचे होते.. ब्रिटीश इंग्लिश चा प्रभाव होता.. पण आता मात्र अमेरिकन इंग्रजीचा प्रभाव आहे.. संगणक सामान्य माणसापर्यंत पोहोचल्यावर इंग्रजी भाषा उत्तम येणे अपरिहार्य झाले आहे...
jspalnitkar
5 वर्षांपूर्वी"मराठी माणसे अशी का घडली" असा उत्सुकता निर्माण करणारा मथळा असलेला लेख वाचायला सुरुवात केल्यावर मात्र निराशा झाली.... सुरुवातीच्या एक दोन परिच्छेदांमध्ये आलेल्या "बाकीच्या राज्यांमधल्या लोकांची मराठी/महाराष्ट्रीय लोकांबद्दलची मतं" ह्यावरची एक दोन वेगळी निरीक्षणं सोडल्यास नंतर मात्र विषयांची गल्लत आणि सरमिसळ झाली आहे... मराठी/महाराष्ट्रीय माणसांची स्वभाववैशिष्ट्ये जशी आहेत तशी का आहेत ह्यावर फारच त्रोटक विवेचन आहे....(जो ह्या लेखाचा मुख्य विषय आहे अशी माझी समजूत होती)....नंतर मराठी भाषा, तिच्या टिकण्या न टिकण्याविषयीची कारणं आणि उपाय, प्रादेशिक अस्मिता वगैरे नेहेमीचेच विषय आले आहेत...तेही बरेचसे त्रोटक आणि prescriptive आहेत.... असो...!! हे माझं वैयक्तिक मत आहे आणि कुणालाही दुखावण्याचा हेतू निश्चितच नाही. धन्यवाद!!
patankarsushama
5 वर्षांपूर्वीमाहितीपूर्ण लेख
gaurisdate@yahoo.co.in
5 वर्षांपूर्वी'मराठी' भाषा 'भाषा' म्हणून टिकणं फार महत्वाचं आहे. सध्या कोणत्याही वृत्तपत्रातील जाहिराती....आमचा माॅईश्चरायझर तुमच्या स्कीनला साॅफ्ट बनवते...,किंवा पाककृतींच्या 'रेसिपीज्' मधे त्यांना डेसाकेटेड कोकोनट लागतो, कोणताही पदार्थ तळायचा, भाजायचा, परतायचा नसतो तर तो 'डीप फ्राय, रोस्ट, शॅलो फ्राय' करायचा असतो. थोडक्यात 'पुलं'च्या शब्दात....'हल्ली सगळ्यांना मराठी वर्ड रिमेम्बर करायला डिफिकल्ट' जातं'. वृत्तपत्रातील लेख/संपादकीयसुद्धा शुद्ध भाषेत नसते. लाज वाटते/किंवा शुद्धलेखन शिकवलेलं नसतं बहुतेक....'चलता है,' ही वृत्ती सार्वत्रिक झाली आहे. मराठी मालिकांमधील संवादही याला अपवाद नाहीत.....'इंग्लिश'च्या स्पेलिंगबाबत ,व्याकरणाबाबत आग्रही असणार्यांनी मराठीच्या शुद्धलेखन, व्याकरणाबद्दल आग्रहीच असलं पाहिजे. सध्या 'गूगल' चा वापर भरपूर केला जातो, पण त्या शोधात मिळालेली माहिती बरोबरच असते असं नाही—याचं हे एक उदाहरण— 'inverted comma'ला मराठीत काय म्हणतात असं विचारल्यावर उत्तर मिळालं....'उलटा स्वल्पविराम'! गूगलच्या शब्दकोशात 'अवतरणचिन्ह' हा शब्द नाहीॉ. थोडक्यात ज्यांना मनापासून इच्छा आहे त्यांनी 'भाषा' टिकवणं हेच महत्त्वाचं!...तेही बाकी राजकारण, समाजकारण बाजूला ठेऊनच! गौरी दाते.
Amrish
5 वर्षांपूर्वीNicely covered various aspects n good analysis. There were/ are Some efforts for preservation marathi language n culture (in past n present), it wud hv been nice to b covered.