सहा कोटी वर्षे जुनी मुंग्यांची संस्कृती


अंक - सृष्टी,  सप्टेंबर १९७५ 'मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सूर्यासी' याला संत मुक्ताईंनी 'नवलाव जाहला' असं म्हटलं असलं तरी त्यांना यातून मुंगीच्या अफाट क्षमतेकडेही निश्चितच निर्देश करायचा असणार. कारण मुंग्यांचे 'सामाजिक व्यवहार' पाहिले तर माणूस चकीत होतो. निसर्गाने अगदी क्षूद्रातल्या क्षुद्र जिवालासुद्धा जगण्यासाठी संघर्ष करण्याची कुवत, बुदधी आणि कल्पकता दिलेली आहे. त्यातील खाचाखोचा लक्षात आल्या तर निसर्गापुढे नतमस्तक होतो आणि आयुष्याकडे नव्या दृष्टीनं पाहू लागतो. मुंग्यांच्या वर्तनाविषयी अशीच  स्तिमित करणारी माहिती या लेखात दिलेली आहे. निसर्गनवलाच्या अनेक कथा सांगणाऱ्या सृष्टी या मासिकाच्या  सप्टेंबर १९७५च्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.  हा लेख वाचल्यावर नक्कीच मुंगी या विषयावर आपल्याला अधिक वाचावेसे वाटेल. पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले 'मुंगी- एक अद्भभूत विश्व' हे प्रदीपकुमार माने यांचे पुस्तक  ती उत्सुकता शमविण्याचे काम निश्चित करु शकेल. ********** मनुष्याला वाटते मनुष्यच सर्व सजीव प्राण्यांत बुद्धिमान! मानव कोटीत जन्माला आल्याचा आपण किती अभिमान बाळगतो! आपल्या बुद्धीचा, आपल्या संस्कृतीचा मानवाला केव्हा गर्व! पण शास्त्रज्ञांना प्राणिशास्त्राच्या अभ्यासाने असे दिसून आले की, हा आपला गर्व फोल आहे आणि मानवाचे गर्वहरण कोणी केले! तर ते एका छोट्या मुंगीने! मुंग्यांच्या ३५०० जाती आहेत. त्यांची संस्कृती निदान सहा कोटी वर्षांची जुनी आहे असे समजले जाते. कारण सहा कोटी वर्षांपूर्वीचे त्यांचे अवशेष काही लाकडांतून सापडले आहेत. त्यावरून असे दिसते की, मुंग्या ज्या पद्धतीने आज जगतात व कार्य करतात. त्याच पद्धतीने त्या सहा कोटी वर्षांपूर्वीही कार्य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ज्ञानरंजन , सृष्टी

प्रतिक्रिया

  1. shriniwaslakhpati@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    मुंग्यांविषयी खुप-छान-माहिती ! तुमच्या अॕप्लिकेशनवर वेगवेगळ्या प्रकारची छान माहिती असते.पण त्या-त्या लेखांची सूची / यादी ही विषयानुरुप / लेखकाच्या नांवानुरुप अशी काहीतरी पाहिजे. तुमचं ॲप्लिकेशन / अभिप्राय हे नोंदवणं हे कीचकटच आहे. असो. -- श्रीनिवास-लखपती-पनवेल.

  2. nandkumarvmore@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    मुंगी- एक अद्भभूत विश्व’ पुस्तकावर माझेे लोकसत्तेत परीक्षण आले आहे. ते ही संदर्भाला द्या.

  3. nandkumarvmore@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    मुंगी- एक अद्भभूत विश्व’ या प्रदीपकुमार माने लिखित पुस्तकासाठी पद्मगंधा प्रकाशनाच्या पुस्तकावर माझेे लोकसत्तेत परीक्षण आले आहे. ते ही संदर्भाला द्या.

  4. abhimandhawas3@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    चांगला आहे

  5. mailimaye@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    ChinI scientists ni tyanche varul he 1 k. m paryant limbi v kholiche che aste. Townplanning kelya sarkhe ani khup Unhala ani thandi madhe dekhil tethe utkrushta vayuvijan asname aste ase mi vachle ahe.

  6. rsrajurkar

      5 वर्षांपूर्वी

    मूर्ती लहान पण कीर्ती महान . खूप छान माहिती .

  7. anaghav0871@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    😱👌👌 खुप छान.

  8. smmohite.hr@outlook.com

      5 वर्षांपूर्वी

    क्या बात है superb

  9. hemant.a.marathe@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण व मनोरंजन दोन्ही साधलं गेलं



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts