पाठारे प्रभूंचा देदीप्यमान इतिहास : हसतखेळत टाकलेला एक दृष्टिक्षेप

पुनश्च    किशोर आरस    2020-04-04 06:00:53   

अंक - अंतर्नाद, जून २०१७

माणसं काम-धंद्याच्या निमित्तानं जगात कुठं कुठं जातात, त्यातून जाती-धर्म संकराचा वेग वाढतो आणि खोट्या अस्मिता हळू हळू गळून पडतात. जातींच्या इतिहासाकडे पाहतानाही अभिमान, अस्मिता यांचे अडथळे ओलांडूनच पहावे लागते. इतिहास लिहिताना तो वस्तूनिष्ठ असावा, अभिमानाने ग्रासलेला नसावा याची काळजी घ्यावी लागते. पाठारे प्रभूंच्या इतिहासाकडे पाहण्याची अशीच दृष्टी देणारा हा मनोरंजक शैलीत लिहिलेला लेख- ‘‘इतिहासाची पुनरावृत्ती होते हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. आपल्याला ठाऊक नाही ते हे, की इतिहास हा नेहमीच देदीप्यमान असतो. पानिपतावर मराठ्यांची पळून पळून पुरेवाट झाली. पण मराठ्यांच्या इतिहासात मात्र याला झळझळीत सोन्याचा मुलामा दिला जातो. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश जेव्हा जेव्हा जर्मनांकडून मार खायचे, तेव्हा तेव्हा त्याला ते ‘यशस्वी माघार’ असे गोंडस नाव द्यायचे. मुंबईचे आद्य रहिवासी म्हणून कोळी, आगरी आणि भंडारी यांच्यानंतर पाठारे प्रभूंचं नाव घेतलं जातं. आपण मराठीचे जाज्वल्य अभिमानी असल्याचं ते सांगत असतात. त्यामुळे आपल्याला वाटतं, की पाठारे प्रभूंनी मुंबईत आजची मराठी भाषा रुजवली आणि संवर्धित केली. पण वस्तुस्थिती काय सांगते? पाठारे प्रभूंना ‘प्रतिहार प्रभू’ असं दुसरं नाव आहे. ते मुंबईला बाराव्या किंवा तेराव्या शतकात आले असावेत. राजस्थानमध्ये ‘प्रतिहार’ या घराण्याचे राज्य असताना तुर्कांच्या आक्रमणामुळे त्यांनी राजस्थानमधून काढता पाय घेतला. त्यांच्या घराण्याचा मूळ पुरुष हा प्रभू रामचंद्रांच्या सूर्यवंशी कुळातील राजा अश्वपती (ख्रिस्तपूर्व ७०० वर्षं) हा आहे, असा त्यांचा दावा आहे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , इतिहास , समाजकारण
समाजकारण

प्रतिक्रिया

  1. Subhash-Suryavanshi

      5 वर्षांपूर्वी

    छान माहितीपुर्ण लेख!

  2. Axay27

      5 वर्षांपूर्वी

    Chan. Atishay mahitipurna

  3.   5 वर्षांपूर्वी

    Nice

  4. Jayantgune

      5 वर्षांपूर्वी

    फार सुंदर आणि महत्वाचा लेख. जुन्या।मुंबईतील इतर जातींवरही असे लेख असल्यास एकत्र वाचण्यात मजा येईल

  5. manisha.kale

      5 वर्षांपूर्वी

    छान माहिती. मी मूळची गिरगावची. तेव्हा खरोखरच जातीनिहाय वाड्या होत्या गिरगावात कुडाळ देशकर, कुंभार वाडा, सोमण बिल्डिंग अशा पण आता सारखी जातीय तेढ नव्हती. जात असे तरी ती घरात समाजात वावरताना नाही. उलट मला असं वाटतं तेव्हा दांभिकपणा नव्हता. आपापल्या समजा प्रमाणे एकत्र राहात पण तरीही जाती द्वेष नव्हता जो पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात आज प्रकर्षानी जाणवतो.

  6. manisha.kale

      5 वर्षांपूर्वी

    अतिशय माहितीपूर्ण लेख. गिरगांव माझं माहेर. त्यामुळे जुन्या भाटवडेकर वाडी, कुडाळदेशकर वाडी अशा जाती निहाय वाड्या होत्या. पण त्या सर्व उंबऱ्याच्या आत. आता सारखा जातीय द्वेष, तेढ नव्हती तेव्हा. फार छान वातावरण होते आमच्या गिरगावात. सर्व लोकं गुण्यागोविंदानी राहात. टोकाचे हेवेदावे नव्हते. आता सर्व म्हणतात वर वर

  7. किरण भिडे

      5 वर्षांपूर्वी

    शेअर करा...

  8. Nilkanthkesari

      5 वर्षांपूर्वी

    सुंदर, अप्रतिम लेख आहे

  9. mhaskarmv

      5 वर्षांपूर्वी

    अप्रतिम



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts