निवडणुकीच्या नौबती झडूं लागल्या

पुनश्च    गो. वा. पाध्ये    2021-08-14 06:00:03   

अंक : यशवंत, ऑगस्ट १९५१

'गेल्या ७५ वर्षात राजकारण पार रसातळाला गेले, आधी ते मूल्याधारीत होते' असे आपल्याला वाटते ना? मग पहिल्या निवडणुकीच्या वेळी राजकारण आणि निवडणूक याविषयी काही लिहिले गेले होते ते स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी वाचाच! आणि हाच लेख  स्वातंत्र्याचे १५० वे वर्ष साजरी करणारी मंडळी आणखी ७५ वर्षांनी वाचेल याचीही खात्री आपल्याला पटेल.

********

कोरियन युद्ध आणि त्या अनुषंगाने तिबेट भागांतील चीनचे आक्रमण गेल्या वर्षी आम्हांस अस्वस्थ करीत राहिले. नेपाळमधील अंतस्थ बंडाळीने काही काल चित्तस्वास्थ्य लाभले नाही. इराण तेल-लढा आपल्या नजीक असला आणि त्याचे अप्रत्यक्ष परिणामच आपणांस जाणवणार असले तरी त्या लढ्याची सूत्रे कम्युनिस्ट पंखाआडून हलविली जात आहेत व सामोपचाराने हा प्रश्र्न न मिटला तर कदाचित् जागतिक लढ्याचाही संभव आहे, ह्या गोष्टी आमच्या राजकर्त्यांस अस्वस्थ करण्यास पुरेशा आहेत. इराणचे नैसर्गिक धन सर्वस्वी त्याच्या मालकीचे असावे, या तेल-खाणीच्या राष्ट्रीयीकरणाचे इराणचे प्रयत्नांस भारताची सहानुभूतिच आहे. पण या राष्ट्रीयीकरणाची स्फूर्ति मुळांतच प्रतिगामी विचारसरणींत आहे ही गोष्ट लक्षांत घेतां भारताला जागरूक राहावयासच हवे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


यशवंत , राजकारण
राजकारण

प्रतिक्रिया

  1. SHRIPAD GARGE

      4 वर्षांपूर्वी

    गेल्या अनेक वर्षांत आपल्याला भेडसावणाऱ्या अनेक समस्या तशाच आहेत, हे सर्वाधिक काळ असलेल्या (म्हणजे काँग्रेस) सरकारचे अपयश आहे. काश्मीर रुपी गळूवर नुकतीच एक चांगली उपाययोजना झाली आहे. पुढील ७५ वर्षांनंतर हा लेख पुन्हा वाचला गेला तर हा एक संदर्भ नक्की बदलला असेल. आशा आहे की इतर संदर्भ देखील बदलतील.

  2. Kiran Joshi

      4 वर्षांपूर्वी

    त्यावेळच्या परिस्थितीचा संदर्भ त्या लिखाणाला आहे. बदलत्या परिस्थितीतील राजकारणात होणारे मूल्यांचे अधःपतन लेखकाने टिपले आहे. राजकारणात मुळात लोकांचा पाठिंबा,सहभाग व अंतिमतः पडणारी मते यावरच भारतीय लोकशाहीत सत्तागमन अवलंबून असते. तो काळही यास अपवाद नव्हता. पण सत्ताग्रहण सत्ताग्रहणासाठी आजच्यासारखा घोडेबाजार, लक्ष्मीदर्शन व तत्त्वांची पायमल्ली त्यावेळेस नव्हती...



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts