अंकः माणूस, मार्च १९६५
नुकतेच मुंबईला ‘शिवराय मंडळा’तर्फे ‘बांधिली पूजा शिवरायांची’ या नावाचे शिवाजीमहाराजांच्या किल्ले-कोटांचे नमुनेदार प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनावर कौतुकाचे स्फुट लिहिताना मुंबईच्या ‘मार्मिक’पत्राने शेवटी अशी सूचना केली, की हे प्रदर्शन ‘महाराष्ट्र परिचय केंद्राने’ दिल्लीत भरवावे व परप्रांतियांना शिवाजीमहाराजांच्या कार्याचा परिचय घडवून आणण्याचे पुण्य पदरी बांधावे. जनतेकडून असा अपेक्षा व्यक्त होणे हेच एखादे कार्य मूळ धरू लागत असल्याचे खरे लक्षण होय. परप्रंतियांमध्येही या केंद्राबद्दल अपेक्षांचा असाच प्रवाह सुरू झालेला दिसतो. गेल्या वर्षी या केंद्रातर्फे ‘हरी नारायण आपटे जन्मशताब्दी महोत्सव’ दिल्लीत साजरा झाला. ‘हरी नारायण आपटे’ यांच्या वस्तूंचे एक प्रदर्शनही या निमित्ताने तेथे केळकरांनी भरवले होते. हेच प्रदर्शन पुढे आंध्र राज्य सरकारच्या निमंत्रणावरून हैद्राबादमध्ये पुन्हा भरविण्यांत आले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .