इराणचा मार्ग बोलन घाटांतून आहे. घांट सुरू होतो तेथे दादर ऊर्फ द्वार नांवाची एक लहानशी गढी होती. या गढीवर मलीक जीवन नांवाचा एक अफगाण गृहस्थ संरक्षक म्हणून होता. तीन चार वर्षांपूर्वी बंडखोरीच्या आरोपावरून मलीक जीवन यास बादशाहाच्या अधिकार्यानी पकडून ठार मारण्यासाठी दिल्लीस आणिलें असतां दाराने त्यास गुन्हे माफ करून परत त्याच्या जागेवर रुजूं केले. हा उपकार स्मरून हा मलीक जीवन संकटावस्थेंत आपणास या वेळी मदत करील या आशेवर दाराने त्याजकडे मदतीची याचना केली. त्याने लगेच जबाब कळविला कीं, अवश्य आपण माझ्याकडे या, मी आपणांस सुखरूप इराणांत पोचवितों.”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .