कच्छचा जम बसवून दारा लगेच पुढे जामनगरास गेला. या वेळीं गुजरातचा धनाढ्य प्रांत त्याच्या आटोक्यांत होता. मुराद त्या प्रांतांतून निघून गेल्यावर तेथें बंदोबस्त असा कांहीं नव्हताच. औरंगजेबाने शहानवाजखान नामक सरदारास गुजरातचे संरक्षणास पाठविलें. दारा अमदाबादेस गेला, तेथें शहानवाजनें त्याचा सत्कार करून त्यास धन्याप्रमाणे वागविले. मात्र बाप जिवंत असल्यामुळे दारानें स्वतः तेथें बादशाही पद स्वीकारलें नाही. हळू हळू त्याजवळ फौज जमत चालली. सुरतेवर माणसें पाठवून त्यानें तें स्थळहि कबजांत घेतलें. तेथे पुष्कळसा पैसा, दारूगोळा व चाळीस तोफा त्यास प्राप्त झाल्या. दाराने मदतीसाठी आपले दूत विजापूर व गोवळकोंडे येथे पाठविलें. या बातम्या ऐकून औरंगजेबानें आपला वडील पुत्र मुअज्जम यास दारावर रवाना केले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .