पाटलाच्या मागचा एकजण म्हणाला, "अर, पण बैल जरा चालवून दाखव बघू !"
आप्पाजी डोळे विस्फारून म्हणाला, "झालं, तुमीबी अगदी नवख्यागतच करायला लागलायसा. हे काय घोडं हाय का काय चालवून बघायला?"
पाटील म्हणाला, "पण चालवून दाखवायला तुझं काय गेलं?”
"बघा कीं ! मी काय न्हाई म्हणतों ? जनावर घेनार तर चांगलं बघून घ्या. पन पाटील, तुमच्या घरांत खोटं जनावर कसे घालीन मी ? मलाबी मानसं वळखत्यात. दत्तू, सोड बैल आनी दाखव चालवून.”
दत्तूनें आप्पाजीकडे बघत बैल सोडला. आप्पाजीला बैलाकडे बघायचें धैर्य नव्हतें. बैलाकडे पाठ करून तो दुसरीकडेच पहात होता. बैल चालवल्याची जाणीव त्याला झाली. त्याच वेळीं कोणतरी म्हणालें,
”मागच्या पायानं लंगडतोय वाटतं ?”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .