दाराच्या चरित्रांतल्या आणखी पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण अगोदरच प्रकरणाचा विस्तार अपेक्षेबाहेर झाल्याने आतां त्यांत भर घालणे इष्ट नाहीं. वाचकांनी मोगल बादशाहीच्या वृत्तान्तांतून त्या गोष्टी समग्रच वाचाव्या हे बरें, सामान्य वाचकांना व विशिष्ट अभ्यासकांना दाराचे एकंदर चरित्र जितकें अद्भुत व करुणरस पूर्ण आहे, तितकंच ते ऐतिहासिकदृष्ट्या बोधपरहि आहे. त्यांतले सर्वच प्रसंग कल्पित कादंबरीलाहि मागे टाकतील असे आहेत. मानवी घडामोड, पुष्कळदा कशा विचित्र बनतात, या भूतलावर मनुष्यस्वभाव किती दुष्ट करणी करूं शकतो, आणि परमेश्वरीलीला म्हणून कांहीं अतर्क्य चीज आहे की, नाहीं इत्यादि विचार मनांत येऊन बुद्धि कुंठित होते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .