रंगभूमीकडे लोक आकर्षिले जाऊं लागले होते ते अण्णासाहेब कथित व रचित “ गायनरसा " मुळे ! परंतु अण्णासाहेबांची व देवलांची नाट्यरचना ऑपेरा-धर्तीची असल्यानें त्यांतील संगीत व पद्यविभाग हा नाटकाचा आवश्यक भाग होता. त्यांच्या कथानकांचा विकास गद्यापेक्षां तुलनेनें पद्यांतून जास्त झाला होता. ही महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे त्या पदांचें जरूर तेवढेच गायन अण्णासाहेबादि नट करीत. गाण्याची मैफल झडवून त्यांनीं आपलें नाटक मारलें नाहीं. परंतु कोल्हटकरांनी नाट्यरचनेची ही किर्लोस्करी धर्ती सोडली व गद्यांतून कथानक रंगविलें. पद्यभाग आला तो प्रेक्षकांची व स्वतःची गाण्याची आवड पुरविण्याकरतां.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .