सगळी तत्त्वज्ञानेच शेतकरीविरोधी आहेत. थेट वामनाच्या अवतारापासून विचार करतो म्हटले, तरी आपल्या असे लक्षात येईल, की बळीराजाने कुठेही काहीही वाईट केलेले नाही. तरी बळीराजाला पाताळात गाडायला देवाने वामनाचा अवतार घेतला. तो का? तर बळीराजा इतके चांगले काम करतो आहे, की त्याच्यामुळे इंद्राचे आसन डळमळीत झालेले आहे. प्रत्यक्ष परमेश्र्वर जर बळीराजाला गाडायला येत असेल, तर तेथे सगळे तत्त्वज्ञान शेतकऱ्यांच्याच विरोधी आहे हे लक्षात येते....अलिकडे कणवेने अथवा सहानुभूतीने शेतकऱ्यांविषयी खूप लिहिले जाते. आत्महत्यांमुळे तशी फॅशन आली आहे. परंतु प्रत्यक्षात शहरी लोकांना, बुद्धिजीवींना शेती शेतकरी याविषयी किती माहिती आहे? अत्यंत महत्त्वाच्या या विषयावरील हे मार्मिक विवेचन केले आहे शेतीचे अभ्यासक चंद्रकांत वानखडे यांनी. पत्रकार, कार्यकर्ता म्हणून त्यांनी जवळून पाहिलेले सत्य या लेखात उतरले आहे- शेतीचा प्रश्र्न वेगवेगळ्या अंगानी मांडला जातो. माझ्या ऐन उमेदीच्या काळामध्ये जयप्रकाशजींच्या चळवळीत असताना १९८० मध्ये जेव्हा मी आणि माझी पत्नी यवतमाळ जिल्ह्यामधल्या एका खेड्यात राहायला गेलो, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये जो शेतीचा प्रश्र्न होता तो एवढाच होता, की गावामध्ये दोन वर्ग आहेत. एक शेतकरी आहे, दुसरा शेतमजूर आहे. शेतकरी शोषक आहे. शेतमजूर शोषित आहे. गावामध्ये राहायचे असेल तर वर्ग-संघर्ष केलाच पाहिजे. भूमिहीन शेतमजुराच्या बाजूने लढले पाहिजे. १९८० मध्ये गावात गेल्या गेल्या पहिला लढा उभारला. शेतमजुरांना किमान वेतन मिळाले पाहिजे! कारण विचारसरणीची जी एक चौकट मेंदूमध्ये होती, तिच्यात असे स्पष्ट होते, की शेतीचा मालक हा ‘आहेरे’ वर्गातला आहे. कारण तो जमिनीचा मालक आहे, म्हणून तो शोषक आहे. शेतमजूर हा भ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
benodekarabhinav@yahoo.com
5 वर्षांपूर्वीमराठी थोर मोठे साहित्यिक यांच्या मांदियाळीत चंद्रकांत वानखेडे हे नाव कधी नाही दिसले .आमचे दुर्दैव ! असले फार कमी वाचनात येते .अंत्यंत विदारक सत्य !