धन्य तुझे हे जीवनदान

पुनश्च    संकलन    2019-06-15 06:00:18   

अंक – एकता, जून १९५३ पं.जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रिमंडळात उद्योग आणि पुरवठा खाते सांभाळत असताना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे काश्मीरच्या मुद्द्यावरुन नेहरुंशी मतभेद झाले. त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने भारतीय जनसंघाची स्थापना केली, ज्यातून पुढे भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला.कलम ३७० ला विरोध करण्यासाठी काश्मीरात जाऊन आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यात आल्यावरही ते काश्मीरात गेले आणि त्यांना अटक झाली. तिथे तुरुंगातच २३ जून १९५३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू रहस्यमय परिस्थितीत झाला असे सांगितले जाते आणि त्या संदर्भात विविध तर्क लढवले जातात. त्यांच्या मृत्युमुळे शोकाकुल होऊन एका अनामिकाने लिहिलेले हे टिपण- ********** डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वारले! डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सुटले! डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी मारले! दि. २२.६.५३ ला डॉ. श्यामाप्रसादांनी काश्मीरच्या थंडगार हवेतील कारागृहात आपला पार्थिव देह अगदी पहाटे ठेवला आणि ते इहलोक सोडून गेले. कारागृहाची सर्व बंधने तोडून फोडून हे वृत्त सर्वदूर जगभर पसरले. हे वृत्त ऐकूनही ऐकलेसे वाटेना! वाचून डोळ्यांवर विश्वास बसेना! ही घटना अगदीच अकल्पित! कोणासही तिची कल्पना नसेल. निदान आगाऊ कल्पना कोणास असल्याची कल्पना आम्हास नाही. कारावासातील ही घटना आम्हाला कशी कळणार? आणि आता कितीही चौकशा केल्या आणि पत्रके काढली तरी, डॉ. श्यामाप्रसाद स्वतः काही सांगावयास येणार नसल्यामुळे आता त्यासंबंधी केवळ कल्पनाच कराव्या लागणार! त्यातील काही कल्पना कदाचित खऱ्या असणे असंभवनीय नाही! डॉ. श्यामाप्रसाद हे खरेच फार मोठे होते. पण त्यांची माता त्यांच्याहून मोठी. तिचे व ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पुनश्च , व्यक्ती परिचय , एकता

प्रतिक्रिया

  1. नयना कुलकर्णी

      6 वर्षांपूर्वी

    Hats off to our great leader.!!!ऊपरवाले के घर देर है अंधेर नही

  2. mahapokharan

      6 वर्षांपूर्वी

    लेख चांगला आहे.

  3. ACKOOL

      6 वर्षांपूर्वी

    Custodial death साठी फेकू नेहरू खान आणि हरामखोर अब्दुल्ला वर खटले दाखल झाले नाहीत हेच जास्त धक्कादायक आहे !!

  4. avthite

      6 वर्षांपूर्वी

    हा लेख ज्यांनी त्यांच्या फोटोला वंदन केले त्यांना वाचायला मिळाला असेल का..

  5. ugaonkar

      6 वर्षांपूर्वी

    वाचून वेळ घालवू नये

  6. arush

      6 वर्षांपूर्वी

    किती प्रेम किती आपुलकी एका पुढार्याबद्दल. खरेच gr8

  7. Vandana

      6 वर्षांपूर्वी

    ?



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts