अंक – किर्लोस्कर, ऑगस्ट १९६३ पुराणांतील वर्णन केलेला मंदार पर्वत आजही विद्यमान आहे. पण पूर्व अफ्रिकेत! एकोणीस हजार फूट उंचीच्या ‘किलिमांजारो’ पर्वतावर आपल्या सौंगड्यांच्या समवेत आरोहण करतांना श्री. केतन शेवडे यांना आलेले गमतीदार अनुभव तुमचे भरपूर मनोरंजन करतील. जगांत उंच म्हणून नांवाजलेली बहुतेक शिखरे हिमालय आणि आल्प्स पर्वतांत झब्बूशाहीचे गट करून बसली आहेत. त्यांचे दर्शन दुरुन घेतांनासुद्धा किती यातायात. मग प्रत्यक्ष चढाई करणाऱ्या टोळ्यांची काम स्थिती होत असेल! ऊर फुटून पाऊल रेटत नाही, प्रकाशाच्या झगझगाटाने डोळे आंधळे होतात, उंचीने भ्रम होतो आणि थंडीने शरीर लाकडासारखे निर्जीव होते. अखेर वादळाच्या एकाच फटक्याने ते कोलमडून पडतात आणि बर्फाच्या अजस्र लोंढ्याखाली त्यांची समाधी बांधली जाते. फाटक्या तंबूचा कलता खाब हीच त्यांच्या अस्तित्वाची खूण दुसरी टोळी येईपर्यंत कुडकुडत उभी असते. माणुसकीचा ओलावा गारठून गेलेले हे पर्वत फार अमानुष आहेत. त्या मानाने पूर्व आफ्रिकेतला आमचा किलिमांजरो पुष्कळ बरा. एकोणीस हजार फुटांवर उंच असल्यामुळे यानेही बर्फाची कानटोपी घातली आहे. पण थंड डोक्याच्या इतर पर्वतासारखा हा माजोरा मात्र नाही. जनता एक्स्प्रेस सारखाच हा अगदी जनता पर्वत आहे— आणि मानवतेने तितकाच ओथंबलेला. शेकडो लोक त्याच्या अंगाखांद्यावर चढून आले असतील. पण त्याने कोणाला दगा दिला नाही की कुणाचा बळी घेतला नाही. शिवाय कार्तिकस्वामीसारखे त्याला बायकांचे वावडे नाही. उलट ह्या बाबतींत तो थोडा मिश्किल आहे. नाजूक बायकांना खांद्यावर घेऊन तो आडदांड नवऱ्यांची मात्र फजिती करतो. जगांतील उंच असा हा ज्वालामुखी टेंगानिकाच्या उत्तर सरहद्दीवर स्वातंत्र्याची नवी मशाल घेऊन उभा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
किर्लोस्कर
, अनुभव
, दीर्घा
, वा. दा. शेवडे
rambhide
6 वर्षांपूर्वीसाधारण १९६२ च्या डिसेंबरमध्ये केलेल्या चढणीच्या या वर्णनामुळे गिर्यारोहण या शास्त्राबद्दल वा कसबाबद्दल लोक किती अनभिज्ञ होते याची कल्पना येते. अॉक्सिजनचा अभाव किती हानीकारक असतो याबाबतचे सार्वत्रिक अज्ञानही लेख वाचताना जाणवते. अशी आतातायी चढण पूर्ण करून लेखक सहीसलामत परत आले हे सुदैवच!