अंक : वाङ्मय-शोभा प्रस्तुत लेखाचे लेखक पुंडलिकजी कातगडे हे गंगाधरराव देशपांडे यांचे शिष्य. गंगाधरराव हे लोकमान्य टिळकांचे उजवे हात, पुढे गांधीजींकडेही त्यांना तेवढेच महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. लोकमान्य आजारी असताना शेवटच्या काळात अर्थातच गंगाधरराव सतत त्यांच्या आसपास होते आणि त्यामुळेच पुंडलिकजीही तिथे असायचे. लोकमान्यांचा आजार बळावल्याचे कळल्यापासून तर त्यांचा मृत्यू होईपर्यंतच्या काळातील सर्व घडामोडी कातगडे यांनी त्यामुळेच अत्यंत जवळून पाहिल्या. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी याविषयी सविस्तर लिहिले आहे. त्यातला काही भाग ‘वाङ्मय-शोभा’या मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी टिळकांच्या निधनाआधीचे काही तास आणि नंतरचे काही तास याचे जे विलक्षण प्रभावी वर्णन केले आहे ते वाचताना आपण प्रत्यक्ष तिथे वावरतो आहोत, असे वाटू लागते. १ ऑगस्ट रोजी, म्हणजे दोनच दिवसांपूर्वी टिळकांच्या मृत्यूशताब्दी वर्षाला प्रारंभ झाला आहे, त्या निमित्ताने हा प्रचितीपूर्ण लेख देत आहोत. कातगडे हे मूळचे बेळगावचे. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही महत्वाचीभूमिका बजावली. त्यांनी केलेले आणखी एक अत्यंत महत्वाचे काम म्हणजे, कानडी-मराठी शब्दकोष. ********** पुण्याच्या स्टेशनवर कांही लोक भेटले त्यांनी बातमी दिली की लोकमान्यांची प्रकृति विशेष गंभीर आहे. श्रीमान जगन्नाथ महाराजांच्या कामांतील अपिलासाठी ते मुंबईस गेले होते. पुण्याहून मुंबईस लोकमान्यांच्या दर्शनास जाणाऱ्या लोकांशी त्यांच्या प्रकृतीविषयीच चर्चा चालू झाली. मुंबईस सरदारगृहामध्ये लोकमान्य आजारी होते. आणि त्यांची बहुतेक सर्व मंडळी तेथेच उतरलेली होती. लोकमान्यांच्या पक्षांतील लोकमान्यांच्या दर्शनासाठी किंव
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, अनुभव कथन
, वाङ्मय-शोभा
, व्यक्ती विशेष
व्यक्ती विशेष
Ashwini Gore
4 वर्षांपूर्वीअसे देशभक्त नेते पुन्हा होणे नाही . 🙏
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीभावस्पर्शी, विलक्षण, संवेदनशील लेखन, वाह
Aparna Ranade
4 वर्षांपूर्वीखुपच सुंदर माहिती,डोले भरून आले
मंदार केळकर
4 वर्षांपूर्वीविलक्षण !
Anant Tadvalkar
4 वर्षांपूर्वीअप्रतिम! शब्दातीत ! मराठी माणसे आणि मराठी मने, या आचार्य अत्रे यांच्या पुस्तकातील लोकमान्य टिळकांवर चा लेख आठवला. त्यांनी वर्णन केलेले सरदार ग्रहा समोरचे वातावरण आठवले खूप हेलावून टाकणारे लेखन!
Vinesh Salvi
4 वर्षांपूर्वीसुंदर,माहितीपूर्ण विशेषतः टाइम्स आणि ...
Suhas Joshi
4 वर्षांपूर्वीनिःशब्द
Rutu Rani
4 वर्षांपूर्वीटाईम्स आजही अतिरेक्यांच्या, देशद्रोह्यांच्या, नक्षली लोकांच्या बाजूने आजही लिहितो, अतिरेक्यांचे फोटो छापतो.
atul58@yahoo.com
5 वर्षांपूर्वीहा लेख लोकमान्य वरच्या एखाद्या पुस्तकात समाविष्ट करून त्याला कायमी स्वरूप देण्याची कृपया करावी.
prasadj21@gmail.com
5 वर्षांपूर्वीमाहितीपुर्ण लेख. विशेषतः टाईम्सचा प्रताप कळाला.
advshrikalantri@gmail.com
5 वर्षांपूर्वीभाव स्पर्श करणारे लेखन।नवीन माहिती
mandar.keskar77@gmail.com
6 वर्षांपूर्वीडोळे भरून आले.... निःशब्द
SMIRA
6 वर्षांपूर्वीनि:शब्द ...
raghuvir@swsfspl.com
6 वर्षांपूर्वीविलक्षण प्रभावी वर्णन.. पूर्ण चित्र डाेळ्यासमाेर उभे राहिले
asiatic
6 वर्षांपूर्वीफारच ह्रद्य.
mukundmk
6 वर्षांपूर्वीमन भरून आले. लोकमान्य शब्दाचा खरा अर्थ कळला.
deepa_ajay
6 वर्षांपूर्वीनिःशब्द अतिशय सुंदर,