मराठी साहित्यात विनोदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आणि विनोदी लेखकाला विदुषकी चाळ्यांमधून बाहेर काढून व्यंग, उपहास, वक्रोक्ती यांतून समाजातील विविध वाईट-घातक प्रवृत्तींवर प्रहार करण्याचे काम सर्वप्रथम कोल्हटकरांनी केले. त्यांनी विनोदाला हेतूची जोड देऊन, सामाजिक सुधारणाविषयीच्या आस्थेची धार देऊन त्यांस गंभीर लेखनाच्या तोडीस तोड स्थान मिळवून दिले. हिंदू चालीरीती, समज, मरणोत्तर क्रियाकर्मे आणि त्याविषयीचे आकलन यांच्यावर प्रहार करताना या लेखात कोल्हटकरांनी जे काही विनोद केले आहेत, त्यातून त्यांचे ज्ञान, अभ्यास, पांडित्य दिसून येते. भोंदू आणि धार्मिक भोळेपणावर प्रहार करताना तर त्यांच्या प्रतिभेला कमालीचा बहर येतो. नेट लावून हा लेख वाचताना आपल्या सर्व संस्काराची सालपटे काढून ठेवल्यासारखे वाटते. हा लेख आठ दशकांहून अधिक जुना आहे, यावरुन कोल्हटकरांच्या धाडसाचीही कल्पना येते. ********** मरणोत्तर अंक – उद्यान – संक्रातीचा खास अंक मानवी जीवनाला रंगभूमीची उपमा देण्यात येते ती कितीतरी सार्थ आहे! या लाक्षणिक रंगभूमीवर बरी वाईट कामे करून मनुष्य मृत्युरूपी पडद्याच्या आत अंतर्धान पावतो, तो पुन्हा म्हणून दिसत नाही. वास्तविक रंगभूमीवरील नटांनासुद्धा पुढील पडदा किंचित बाजूला सारून आतून प्रेक्षकांकडे पहाण्याची सक्त मनाई असते. तथापि तिला न जुमानता एखादा नट प्रेक्षकांची संख्या अजमावण्याकरिता किंवा त्यात आपल्या परिचयाचे कोणी आहे की काय हे पहाण्याकरिता पडद्याच्या फटीतून बाहेर पहातोच. नाटकमंडळीच्या परिचयांतला एखादा प्रेक्षक पडद्याच्या आत गेल्यास आपले पडद्यामागील अस्तित्व इतर प्रेक्षकांस जाहीर करण्याकरिता मुद्दाम पडदा किलकिला करून आपल्या तोंडाचे प्रदर्शन करितो. पण मृत्युरूप ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
prashant1414joshi@gmail.com
6 वर्षांपूर्वीलोकहितवादी आणि श्री कृ कोल्हटकर यांचे लेख आपल्या उपक्रमात छापून, सदर उपक्रम केवळ, मनोरंजन किंवा बौद्धिक मनोरंजन यासाठी नाही आहे , हेच एकप्रकारे आपण सुचवले आहे , स्तुत्य उपक्रम ... धन्यवाद
purnanand
6 वर्षांपूर्वीलेख जुना असूनही सद्द्य परिस्थितीत अगदी तंतोतंत लागू होतो. रूढी चाली रिती यांच्यावर उपहासगर्भ भाषेत छान समाचार घेतला आहे. श्री वि.ह.कुलकर्णी यांच्या 'व्यक्तिरेखा ' या पुस्तकात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्यावर एक अप्रतिम लेख आहे.त्यात त्यांची बुद्धिमत्ता,वाचन,यावर वाचताना छाती दडपून जाते. खूप छान लेख दिल्याबद्दल धन्यावाद्द.