मातृभाषेतून शिक्षणाची परंपरा विविध व्यावहारिक कारणांनी खंडीत होत असताना मराठी भाषेतील बालसाहित्यापुढेही आज मोठी आव्हाने उभी राहीलेली आहेत. परंतु एकेकाळी मराठीत जेव्हा केवळ प्रौढ साहित्याची निर्मिती होत होती तेव्हा बालसाहित्याचा विचार करणारे थोरच म्हटले पाहिजेत. विनायक कोंडदेव ओक यांनी बालबोध नावाचे मासिक १८८१साली सुरु केले होते. त्यानंतर १९०६ साली वासुदेव गोविंद आपटे यांनी ‘आनंद’ हे मासिक मुलांसाठी सुरू केले. या मासिकाला पन्नास वर्षे पूर्ण झाली तेंव्हा म्हणजे १९५६ साली साप्ताहिक साधना मध्ये वासुदेव आपटे यांचा परिचय करुन देणारा हा लेख आला होता. आजही असे प्रयत्न व्यावसायिकदृष्ट्या फार फायदेशीर ठरत नाहीत हे वास्तव वेदनादायीच आहे. *** अंक- साधना ३० जून १९५६ श्री. वासुदेव गोविंद आपटे यांनी मराठी मुलांची समाजाकडून होणारी आबाळ पाहून पन्नास वर्षांपूर्वी बालदेवांची सेवा म्हणून ‘आनंद’ मासिकाची स्थापना केली. मराठी बालकांच्या जीवनातील पन्नास वर्षांच्या आनंदयात्रेचा हा आढावा सर्वांना रोचक वाटेल. महाराष्ट्राला सातत्ययोग कधी साधला नाही. जेथे सातत्य आढळते तेथे संस्थांची संस्थाने होऊन फुलांऐवजी निर्माल्याचेच दर्शन घडते. सातत्य आणि तेजस्विता असा संयोग क्वचितच आढळतो. असा संयोग आढळला तर स्वाभाविकपणेच आनंद होतो. ‘आनंदा’ने आपली पन्नास वर्षे पूर्ण करून एकावन्नाव्या वर्षात पदार्पण केले, हा असाच एक सुयोग आहे. आनंदाच्या जनकाची थोरवी पन्नास वर्षांपूर्वीच्या समाजाची कल्पना मनात आणली म्हणजे आनंदाच्या जनकाची थोरवी ध्यानात येते. मुलांची होणारी आबाळ आपल्या समाजातील पुष्कळ लोकांना आज जाणवू लागली आहे. जागजागी बालमंदिरे, बालोद् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी नियतकालिक
, साधना
, आनंद
, बहुविध संकलन
shripad
6 वर्षांपूर्वीअतिरिक्त दुवे देण्याची कल्पना उत्तम आहे. छान!