केवढी ही ज्ञानाची हौस आणि शीलाची काळजी!

पुनश्च    वि. वि. बोकील    2019-12-07 06:00:00   

‘‘मुलाचे शील सुधारावे म्हणून जुन्या कवींच्या निवृत्तीपर कविता ठासून भरलेल्या असतात. काय करू नये ह्याबद्दल एक कविता आठवतेय. ‘गांजा ओढू नको, सुरा पिऊ नको, तूं भांग घोटूं नको--’ आणि शेवटी म्हटले आहे ‘वेश्येसी पाहू नको.’ आठ नऊ वर्षाच्या मुलाला वेश्या या शब्दाचा अर्थ शिक्षकाने कसा पटवून द्यावा?’’ वि. वि. बोकील यांनी हा प्रश्न विचारला होता १९४७ सालची पाठ्यपुस्तके पाहून! थोडक्यात काळ कुठलाही असो, पाठ्यपुस्तके आणि पढतमुर्ख यांची संगत काही सुटत नाही.  आजच्या पुस्तकांमधील चुका आपण नेहमीच वाचतो. इंग्रजांच्या काळात तयार झालेली पाठ्यपुस्तके काय ‘उजेड पाडत होती’ यावर  सत्तर वर्षांपूर्वीचा लेख प्रकाश टाकतो. विष्णु विनायक बोकील  (२ जून १९०३ - २२ एप्रिल १९७३) हे लोकप्रिय लेखक, पटकथालेखक, नाटककार आणि शिक्षणतज्ज्ञ होते. ‘कुबेर की रंक’, ‘तू तिथे मी’ व इतर कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ‘तारांबळ’ ‘लगीनघाई’ आदी नाटके लिहिली. ‘चिमुकला संसार’ हा त्यांचा गाजलेला चित्रपट. बोकील यांचा हा लेख मुळात आकाशवाणीवरील (तेंव्हाचे आल इंडिया रेडिओ) भाषण होते. ............................. अंक-  रसना, जानेवारी १९४८ प्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ, सुप्रसिद्ध कादंबरीकार व प्रथितयश कथालेखक श्री. वि. वि. बोकील यांनी ३१ ऑक्टोबर १९४७ रोजी क्रमिक पुस्तकावर मुंबई रेडिओवर जे सुप्रसिद्ध व मार्मिक भाषण केले ते ऑल इंडिया रेडिओच्या परवानगीने वाचकांना सादर करीत आहो. आम्ही श्री. बोकील व रेडिओ कंपनी यांचे आभारी आहोत. ‘आमच्या वेळेला असं नव्हतं बुवा’ म्हणून मागच्या आठवणींना उजाळा द्यायचा व नवीन गोष्टींना नाके मुरडायची ही म्हाताऱ्या लोकांची खोड पुष्कळांना पाठ असेल. या झाल्यागेल्या मंडळींना जुने ते ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , इतिहास , शिक्षण , रसना

प्रतिक्रिया

  1. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    आचार्य अत्रेंच्या वाचनमालेचा उल्लेख आढळला नाही .

  2. ajitpatankar

      5 वर्षांपूर्वी

    वाह...इंग्रजांची राजवट स्थिरावल्यावर, शालेय शिक्षण विषयक छान आणि नवीन माहिती मिळाली...



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts