अनंत फंदी (१७४४ - १८१९) हे उत्तर पेशवाईत गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजी बाळांनी त्यांचा गौरव केला होता. पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारच्या रसाळ व प्रासादिक रचना त्यांनी केल्या आहेत. दुसऱ्या बाजीरावांची प्रथम याच्यावर मर्जी होती, तथापि पुढे त्यांचे बिनसले होते असे म्हणतात. अनंत फंदी यांच्या आयुष्याचा हा रसभरीत ताळेबंद, ६२ वर्षांपूर्वीच्या म्हणजे १९५८च्या दीपमाला'मधून- ...................... अंक – दीपमाला, नोव्हेंबर १९५८ धोंड्याने बुद्धि वळणावर शाहीर-कवि अनंत फंदी यांचा जन्म इ.सन १७४४ मध्ये संगमनेर (जिल्हा- अहमदनगर) येथे झाला. लहानपणी ते उनाड व खोडकर होते. त्यांचे वडील लवकरच मयत झाल्यामुळे व त्यांना भाऊ, बहीण वगैरे कोणीच नसल्यामुळे ते आईचे फार लाडके होते. शाळेतल्या अभ्यासाकडे त्यांचे लक्ष नव्हते. दिवसभर ते उनाडक्या करीत व आईचे मुळीच ऐकत नसत. संगमनेरात त्यावेळी एक भवानीबुवा नावाचे संतपुरुष होते. त्यांच्या मठांत अनंत फंदी जाऊन बसावयाचे व त्या गावांत फक्त त्यांनाच तेवढे मानायचे. एके दिवशी ते आपल्या आईवर खूप रागावले व भवानीबुवांच्या मठांत जाऊन राहिले. सकाळ झाल्यावर त्यांचा शोध करीत आई मठांत आली. मुलगा तेथे बसलेला पाहून ती त्यांची गाऱ्हाणी भवानीबुवांना सांगू लागली. फंदीवर बुवा फार रागावले व त्यांनी फंदींना एक धोंडा फेकून मारला व मठांतून निघून जाण्यास सांगितले. बुबांचा धोंडा अंगावर बसताच फंदींची बुद्धी वळणावर आली व ते कविता करायला लागले. लवकरच त्यांनी पोवाडे व लावण्या रचायला सुरुवात केली व काही साथीदार जमवून तमाशाचा फड उभा केला. घोल ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीचांगला लेख आहे .
kulkarnimedha71@gmail.com
5 वर्षांपूर्वीChan
patankarsushama
6 वर्षांपूर्वीछान
shripad
6 वर्षांपूर्वीछान!