राजा परांजपे यांना आपण ओळखतो 'लाखाची गोष्ट', 'पेडगावचे शहाणे', 'जगाच्या पाठीवर' अशा उत्तमोत्तम चित्रपटांसाठी, त्यांच्या अभिनयासाठी. असा प्रसिद्ध कलावंत जेंव्हा चित्रपटसृष्टीतील आपल्या अनुभवांविषयी लिहितो तेंव्हा तो साहजिकच आपल्या आठवणी चघळीत मोठेपण मिरवणार अशी आपली अटकळ असते. १९५१ साली राजा परांजपे यांनी लिहिलेल्या या लेखात मात्र आठवणींचा सूर आळवलेला नाही. कर्तृत्वाची शक्यता संपल्यावर माणूस अशा आठवणीत रमतो म्हणतात, हा लेख लिहिला तेंव्हा राजा परांजपे कर्तृत्वाच्या पायऱ्या चढण्याची तयारी करत होते. कारण पेडगावचे शहाणे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२) आणि जगाच्या पाठीवर (१९६०) हे राजाभाऊंचे तिन्ही श्रेष्ठ चित्रपट हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आलेले आहेत. लेख वाचताना, राजा परांजपे यांना असे काही मोठे आपल्या हातून घडणार आहे याचा अंदाज आला असावा याची खात्री पटते- ********** अंक – युगांतर, दिवाळी १९५१ मी एक साधासुधा कलावंत आहे. विवेचनात्मक लेखन हा काही माझा व्यवसाय नव्हे. आपल्या कलागुणांच्या जोरावर कलाप्रेमियांची करमणूक करावी आणि जातांजातां चारदोन उपदेशाच्या गोष्टी हळूच सांगता आल्या तर पहाव्या ही मनातील इच्छा आहे. पटाईत लेखकांच्या क्षेत्रावर अतिक्रमण करण्यास मनाला संकोच वाटतो. कारण लेखनाच्या क्षेत्रात मी अनभिज्ञ आहे. तथापी ज्या व्यवसायांत मी हिरीरीने काम करतो आहे त्या व्यवसायाबद्दल आपण स्वतःच काहीतरी विचार मांडण्याची वेळ आतां आली आहे असे वाटू लागल्यामुळेच हा अल्पसा प्रयत्न मी करीत आहे व त्याच दृष्टीने या लेखाकडे वाचकांनी पहावे अशी प्रार्थना आहे. ‘सिनेसृष्टीतील माझे अनुभव’ हा माझ्या लेखाचा विषय आहे. या क्षेत्रांतील कलावंतांना कोणकोणत्या प्रकारचे अ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
benodekarabhinav@yahoo.com
5 वर्षांपूर्वीबराचसा स्वप्नाळू वाटला ,त्या काळातले लेखन हे बहुदा लिहिणे -वागणे यात प्रचंड फरक असेच असायचे !
nvjoshi
5 वर्षांपूर्वीExcellent choice and excellent article. Many thanks. Apologies for the inability to use devanagari keyboard.
shriniwaslakhpati@gmail.com
5 वर्षांपूर्वीराजा परांजपें हे उत्तम लेखकही होते हे तुमच्यामुळे आमच्यापर्यंत आलं त्याबद्दल पुनश्चच्या टीमचे लाख-लाख-धन्यवाद ! राजा परांजपेंनी जे 1951 साली लिहीलंय ते आजही तंतोतंत लागू आहे. ह्यातच त्यांचं मोठेपण ,दृष्टेपण दिसून येतं. ह्यांनी आत्मचरित्र लिहीलंय का ? असल्यास त्याचं नांव जरूर कळवावे. अशा ह्या खऱ्या-अर्थानं थोर कलाकाराला विनम्र अभिवादन ! आणि पुन्हा-एकदा पुनश्चच्या टीमचे लाख-लाख-धन्यवाद ! -- श्रीनिवास-लखपती-पनवेल.
vilasrose
5 वर्षांपूर्वीलेख खूपच आवडला.मराठी चित्रपटस्रुष्टीसाठी प्रामाणिक प्रयत्न करुन चांगले चित्रपट तयार करण्याची त्यांची तळमळ या लेखातून दिसून येते.राजा परांजपे यांना विनम्र अभिवादन!
किरण भिडे
5 वर्षांपूर्वीसमजलो नाही...जरा सविस्तर लिहिता का? म्हणजे उत्तर देता येईल.
बा.स.कुलकर्णी
5 वर्षांपूर्वीमग हा लेख इथे टाकलाच का ?
patankarsushama
5 वर्षांपूर्वीचित्रपट निर्मितीविषयी छान माहिती .किती तरी मुद्दे विचारात घ्यावे लागतात
avinashjoshi62@rediffmail.com
5 वर्षांपूर्वीछान
prashant1414joshi@gmail.com
5 वर्षांपूर्वीअसे विचार मांडण्याचे धाडस कोणी दाखवले असेल अस वाटत नाही. राजाभाऊ परांजपे यांना विनम्र अभिवादन...