इंग्रजी साहित्यात 'प्रिझन लिटरेचर' नावाची एक संकल्पना आहे. 'प्रिझन लिटरेटचर' म्हणजे अर्थातच लेखक काही कारणाने तुरुंगात असताना त्याने लिहिलेले साहित्य अथवा तुरुंगातील अनुभवांविषयी केलेले लिखाण. तुरुंगात असताना माणूस अंतर्मुख होतो. जगाचा, समाजाचा, आयुष्याचा वेगऴ्या पद्धतीने विचार करु लागतो, त्यातून हे साहित्य जन्माला येते. उदाहरणार्थ मार्को पोलोने त्याच्या चीनमधील प्रवासाविषयी लिहिले ते जिनोव्हा येथील तुरुंगात. हिटलरने त्याचे 'माइन काम्फ' हे आत्मचरित्र लिहिले तेही तुरुंगातच. आपल्याकडेही अशी उदाहरणे आहेत. लोकमान्य टिळकांनी मंडाले येथील तुरुंगात लिहिलेले 'गीतारहस्य', पंडित नेहरूंनी महाराष्ट्रातील अहमदनगर येथील तुरुंगात असताना लिहिलेला 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा भारताचा शोध घेणारा ग्रंथ, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कारागृहाच्या भिंतींवर उमटवलेले साहित्याचे शब्द. दुसरा प्रकार असतो तो तुरूंगवास भोगून आल्यावर प्रसवलेल्या साहित्याचा, तेथील अनुभवाचे शब्दांकन करण्याचा. राजकीय कैद्यांना तुरुंगात तुलनेने अधिक मोकळेपणा असतो. सोबतचे कैदीही अनेकदा ओळखीचे असतात. त्यांचे वागणे, तुरुंगातील सततच्या सहवासातून कळलेले काही कंगोरे यावर नंतर केले गेलेले लिखाण त्यामुळेच खूप वेगळ्या प्रकारे केले जाते. समाजवादी विचारवंत ग.प्र. प्रधान यांचा प्रस्तुत लेख हे अशाच प्रकारातले अतिशय मनोज्ञ असे लिखाण आहे. गणेश प्रभाकर तथा ग.प्र. प्रधान ( २६ ऑगस्ट १९२२ ते २९ मे २०१० ) हे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक, लेखक आणि राजकीय भाष्यकार म्हणूनही त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अवकाशात मूलभूत योगदान दिले आहे. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर आणिबाणीच्या कालखंडात त्यांनी कारावास भोगला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीकारागृहात राहुनही अगदी तटस्थपणे, सगळे कंगोरे दाखवत लेख लिहीलाय.
Harihar sarang
4 वर्षांपूर्वीछान।
jyoti patwardhan
4 वर्षांपूर्वीएखादी सुज्ञ व्यक्ती भोवतालची परिस्थिती जशी असेल तशी तिच्याशी जुळवून घेते व त्यातूनही स्वतःला घडवणे, बोध घेत राहणे हे कसं साधते हा बोध आपण ह्या लेखातून घ्यायचा.
sidhayevarsha277@gmail.com
5 वर्षांपूर्वीसुंदर वाचन आणि लेख दोन्हीही!