अर्पणपत्रिकांची झाडाझडती

पुनश्च    श्री.ज. जोशी    2020-09-12 06:00:10   

दिवाळी अंकः ललित – १९६९ लेखाबद्दल थोडेसे : Anecdotes या इंग्रजी शब्दाच्या जवळ जाणारा मराठी शब्द आहे, 'किस्से', परंतु त्यातूनही पूर्ण अर्थ प्रतीत होत नाही. प्रत्येक क्षेत्रात अशा काही घटना घडत असतात, ज्यांना इतिहास म्हणून फार महत्व नसते, क्वचित ते 'गॉसीप'ही असते परंतु तरीही त्याला रंजनमूल्य असते, त्यांची नोंद झाली तर त्यातून आपोआपच एका इतिहासाची नोंद होते. इंग्रजीत जवळपास प्रत्येक क्षेत्रातील असे किस्से आणि मार्मिक निरिक्षणे प्रसिद्ध होत असतात. आजच्या लेखालाही मराठीतील anecdotes म्हणता येईल आणि त्याचा विषय अतिशय मनोरंजक आहे.  अर्पणपत्रिका हा अनेक किवा जवळपास सर्वच लेखकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. 'माझी पत्नी सौ अमूक तमूक, चिरंजीव अलाणे आणि कन्या फलाणे यांनी घरातील कामांचा बोजा माझ्यावर कधीच टाकला नाही म्हणूनच मी हे लेखन पूर्ण करु शकलो' अशा अर्पणपत्रिकांची संख्या तर शेकडो-हजारोंच्या घरात असेल. हे लटांबर अनेकदा सून, जावई आणि गोड नातवंडे इथपर्यंतही जाते. तर लेखक श्री.ज. जोशी यांनी या लेखात अर्पण पत्रिकांचा जो काही धांडोळा (आणि हजेरी) घेतली आहे तिला तोड नाही. दुर्देवाने या पद्धतीचे लिखाण मराठीत फार नाही. श्री.ज. जोशी हे विपुलप्रसवी लेखक होते. 'आनंदी गोपाळ' या कादंबरीमुळे त्यांचे खरे नाव झाले तरी त्यांच्या कथा, कादंबऱ्यांची संख्या मोठी आहे. सामाजिक, चरित्रात्मक, भाषांतरित अशा विविध प्रकृतीच्या कांदबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांनी ललितलेखनही भरपूर केले. त्यांच्या ललितलेखनाला सौम्य विनोदीचा छानसा पदर असे, त्याचा अनुभव हा लेख वाचतानाही येतो. हा पन्नास वर्षांपूर्वीचा लेख वाचता ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , निबंध , ललित मासिक

प्रतिक्रिया

  1. Vilas Shamrao Wagholikar

      5 वर्षांपूर्वी

    जीए कुलकर्णी यांच्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिका विचार करायला लावणाऱ्या होत्या.

  2. jrpatankar

      5 वर्षांपूर्वी

    लेख छान पद्धतीने मांडला आहे. हा एक चांगला संशोधनाचा विषय होऊ शकतो.

  3. chandratre_adv@yahoo.co.in

      5 वर्षांपूर्वी

    वेगळ्या विषयांवरचा छान लेख.

  4. asiatic

      5 वर्षांपूर्वी

    गमतीदार व वाचनीय लेख. विषयही वेगळा आहे. निरीक्षणे छान.

  5. vishwasdeshpande

      5 वर्षांपूर्वी

    लेख वाचून मनापासून आनंद वाटला किती तरी वेगळी माहिती मिळाली.

  6. advshrikalantri@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    विषयाची नाविन्यपूर्ण मांडणी

  7. advshrikalantri@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    नवा विषय ,नवी माहिती

  8. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    खुपच सुंदर . वेगळ्याच विषयावरचा लेख वाचायला मिळाला . धन्यवाद !

  9. SubhashNaik

      5 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर, वाचनीय लेख आहे. या विषयावर अन्य कुणी लिहिले आहे का, पाहिले पाहिजे. - सुभाष नाईक, पुणे



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts