गांधीजी आणि त्यांचे घड्याळ


" गांधीजींनी जीवनातल्या अनेक गोष्टींतून आम्हाला मुक्त होण्याची शिकवण दिली. पण एका वस्तूशी मात्र कायमचं जखडून ठेवलं. ती ही वस्तू. " त्या घड्याळयाकडे मोठ्या कौतुकाने एखाद्या अवखळ पोराकडे पाहावे तसे पाहत बाळकोबा बोलत होते. दिवसाच्या प्रत्येक क्षणाचे मोल जाणत जगणे ही एक साधनाच आहे. गांधीजींच्याविषयी विचार करताना अनेक त-हेची कोडी पडतात. गांधीजी आणि भगवद्गीता. माणसाला नव्या नव्या कोड्यातच टाकणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. गांधीजींचा जीवनग्रंथ आणि व्यासांनी दिलेला गीताग्रंथ अवघड गणितांसारखा सोडवत बसावा. उत्तर सापडले असे वाटावे आणि सापडले त्याहूनही निराळे असावे अशी लगेच शंका यावी. गीतेप्रमाणेच गांधीजींनीही जीवनाच्या किती विविध अंगांना स्पर्श केला. गीता जशी भक्तियोग, कर्मयोग असे अनेक योग सांगते तसाच गांधींचा जीवनग्रंथ असंख्य योगांचे दर्शन घडवतो. पण त्यांचे घड्याळाशी जुळलेले नाते पाहिले म्हणजे वाटते की गांधींना प्रिय असलेला योग एकच होता : तो म्हणजे उद्योग.

ह्या माणसाने एका आयुष्यात किती उद्योग केले ! लहानसहान वाटणाऱ्या गोष्टींचा किती खोलात जाऊन विचार केला. ते राजकारणी होते, धर्मजिज्ञासू होते, शिक्षक होते, डॉक्टर होते, वकील होते, विणकर होते, चांभार होते, भंगी होते, पत्रकार होते, संघटक होते, प्रयोगशील ऋषी होते, कृषिक होते, स्वतःचे अर्थशास्त्र निर्माण करणारे अर्थशास्त्रज्ञ होते, अहिंसात्मक युद्धतंत्र निर्माण करणारे सेनापती होते....ही यादी सरता सरणार नाही. इतक्या निरनिराळ्या उद्योगांत स्वतःला गुंतवून घेणाऱ्या ह्या माणसाच्या दिवसाला तास तरी किती होते ?

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


युगात्मा
प्रासंगिक

प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख आहे . धन्यवाद.

  2. मंदार केळकर

      4 वर्षांपूर्वी

    गांधींचं एका वेगळ्याच दृष्टीने केलेलं अवलोकन. विचार प्रवृत्त करणारा लेख

  3. Ravi Shenolikar

      4 वर्षांपूर्वी

    महान व्यक्तीबद्दल थोर लेखकाचा लेख. असे लेख शालेय पुस्तकात घेतले पाहिजेत. नव्या पिढीचे ह्यापेक्षा उत्तम मार्गदर्शन कोण करू शकेल?

  4. Ashwini Gore

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय सुंदर , गांधीजींना अधिक सोप्या पद्ध्तीने समजावून सांगण्याचे काम साक्षात पुलंनी केलंय , अप्रतिम . ' युगात्मा ' मधून छान लेख वाचायला मिळतायेत , धन्यवाद

  5. Medha Vaidya

      4 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख।

  6. Suhas Joshi

      4 वर्षांपूर्वी

    इतका चांगला लेख दिल्याबद्दल आपले आभार

  7. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    युगात्मा मधून विविध लेखकांच्या लेखणीतून जे गांधी भेटत आहेत त्यातून गांधी या नावाचे गारुड का लोकांवर होते ते कळून येते

  8. Chandrakant Chandratre

      4 वर्षांपूर्वी

    पुलच ते.

  9.   4 वर्षांपूर्वी

    फार छान लेख! पुलंनी गांधीजींच्या वागण्यातील अध्यात्माचे नेमके वर्णन केले आहे !



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts