अंक – रम्यकथा, मार्च १९५२
कथेबद्दल थोडेसे : आपल्या संस्कृतीच्या महानतेच्या पोकळ गप्पा मारणारे खूप असतात. आपल्या संस्कृतीचे मोठेपण शोधून काढून, संशोधन करुन ती धरोहर एकत्र करणारी दुर्गाबाईंसारखी विदुषी दुर्मिळ. अरेबियन नाईट्ससारख्या सुरस कथा, गॉड ऑफ द रिंग्स सारखे कल्पनांच्या भराऱ्या असलेले चित्रपट, हॅरी पॉटरसारख्या विचित्र जग साकार करणाऱ्या चित्रपट मालिका यांचे आपल्याला अमाप कौतुक. परंतु या सर्व कल्पना फिक्क्या फडाव्यात एवढ्या अदभूत लोककथा आपल्याकडे आहेत. दुर्गाबाईंनी अखंड भटकंती करुन त्या शोधून काढल्या, लिहून काढल्या. त्यातलीच ही एक कथा आहे, काय धमाल, विचित्र आणि विक्षिप्त आहे, ते वाचून बघा..भारतात यावर सिनेमा काढला तर तो दक्षिणेतला एखादा दिग्दर्शकच करू शकेल..
*******
एक होता कुणबी, त्याला बायका-मुले होती. पण शेती भाती कांही नव्हती. त्यामुळे त्याची नेहमी उपासमार होत असे. त्यामुळे एके दिवशी तो अगदी कंटाळला. त्या दिवशी त्याने खांद्यावर घोंगडी टाकली आणि तो घराबाहेर पडला. आपले नशीब काढायचा त्याने निश्चय केला. वाटेंत त्याला एक कोल्हा भेटला. तो कोल्हा त्याला म्हणाला,
‘मी तुला खातो.’ त्यावर तो कुणबी त्याला म्हणाला, ‘तुला जर मला खायचेंच असले तर खुशाल खा.’
तेव्हा कोल्हा त्याला म्हणाला, ‘इतका जिवावर उदार रे कां झालास?’
कुणबी त्याला म्हणाला, ‘उदार होऊं नको तर काय करूं, बायको बामणाकडे दळणकांडण करते आणि कांही तरी कोंड्याचा मांडा करून आणते आणि आम्हांला खायला घालते. अशाने कसे होणार? मग काय करायचे?’
कोल्हा म्हणाला, ‘जा बाबा, मी नाही तुला खात. तू आपला खुशाल निघून जा.’ असे म्हणून कोल्हा निघून गेला.
कुणबी पुढे वाट चालूं लागला. वाटेने त्याला एक वाघ भेटला. वाघ त्याला म्हणाला,
‘थांब, शेतकरीदादा, तुला मी खातो.’
कुणबी म्हणाला, ‘खा बाबा. तू जर माझ्याहून बलवान आहेस तर तू मला खाणारच. मग खाल्लंस तर काय झाले?’
वाघाला नवल वाटले. त्याने विचारले, ‘का रे बाबा, एवढा जिवावर उदार का तूं?’
कुणबी म्हणाला, ‘काय करायचे, बायको बामणाकडे जाते दळण कांडण करते आणि आम्हांला चार घास घाऊ घालते. अशाने काय होणार?’
‘असे काय?’ वाघ म्हणाला. ‘तर मग मी तुला खात नाही.’ असे म्हणून वाघ निघून गेला.
कुणबी पुढे चालू लागला. त्याला लघवीला लागली. घोंगडी दगडावर ठेवून, तो लघवीला बसला. त्या दगडाखाली एक नाग होता. तो शिरला घोंगडीत. कुणब्याने घोंगडी उचलली.
घोंगडीखालून नाग म्हणाला, ‘तुला मी चावतो.’
‘डस बाबा. डसलास तर मी पांच मिनिटांत सुटेन तरी’ नागाला नवल वाटले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Ashwini Gore
4 वर्षांपूर्वीमनोरंजक !!
Dhanashree karmarkar
4 वर्षांपूर्वीअद्भुत कथा..
Varsha Sidhaye
4 वर्षांपूर्वीग्रीक पुराणात पण सेम अशी एक कथा आहे त्यांच्या आणि आपल्या बऱ्याच कथात साम्य आहे । खूप दळणवळण असणार लोकात त्या काळी
Varsha Sidhaye
4 वर्षांपूर्वीग्रीक पुराणात पण सेम अशी एक कथा आहे त्यांच्या आणि आपल्या बऱ्याच कथात साम्य आहे । खूप दळणवळण असणार लोकात त्या काळी
Varsha Sidhaye
4 वर्षांपूर्वीग्रीक पुराणात पण सेम अशी एक कथा आहे त्यांच्या आणि आपल्या बऱ्याच कथात साम्य आहे । खूप दळणवळण असणार लोकात त्या काळी
Varsha Sidhaye
4 वर्षांपूर्वीग्रीक पुराणात पण सेम अशी एक कथा आहे त्यांच्या आणि आपल्या बऱ्याच कथात साम्य आहे । खूप दळणवळण असणार लोकात त्या काळी
Vijaykumar Pokal
4 वर्षांपूर्वीकथा पुर्ण वाचता येत नाहीत. पाठवून काय ऊपयोग.
Sadhana Anand
4 वर्षांपूर्वीअश्या कथा लहानपणी चार्तुमास कहाणी संग्राहात वाचल्याचे आठवते.
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीसुंदर लोककथा. या कथेमागचा अर्थ शोधावा तसा प्रत्येकाला वेगवेगळा लागू शकतो
Anant Subhedar
4 वर्षांपूर्वीखूपच छान आहे ????
DEEPA ELECTRICALS
4 वर्षांपूर्वीछान लोककथा वाचत रहावसं वाटतं
Renkoji Dahe
4 वर्षांपूर्वीभारावल्यासारखा वाचतच गेलो. बालपणीचा काळ सुखाचा..ग्रामीण बोली भाषेत अशा कथा ऐकायला मिळत. माझ्या जन्माआधीच्या काळातले लेखन..साधारणपणे ६९ वर्षे उलटली, या कथेच्या प्रकाशनाला..आपले आभार कुठल्या शब्दांत मानावे..! परत बालपणात घेऊन गेलात..! मनापासून धन्यवाद..✍????????
Vaiju Bhong
4 वर्षांपूर्वीबालपणात हरवले परत......
Shubhangi Kadganche
4 वर्षांपूर्वीविलक्षण कहाणी
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीछान लोककथा - वाचत रहावसं वाटतं . असं अदभूत रसायन लोक कथांमध्ये असतं