आपल्या चळवळीचें स्वरूप त्यांनीं बदलले. जनुभाऊ भडकमकरांकडे जाऊन गोगटे मास्तराविषयी अनेक भयसूचक बातम्या सोडून देण्याचा सपाटा लावला, गोगटे मास्तरांना रोज नाहीं नाहीं त्या बायांची पत्रे येतात. मधूनच शाळेला बुट्टी देऊन गोगटे त्याचेबरोबर बाहेर जातात– दत्ताच्या देवळा मागील टेकडीवर सुर्यास्तानंतर गोगटे एका बाईबरोबर फिरत असल्याचें आपण अनेक वेळा पाहीले–अशा अनेक बातम्या त्यांनी सोडून दिल्या. त्याचा परीणाम जनुभाऊच्या मनावर इतका झाला की, 'असा' इसम आपल्या-पोराबाळांच्या चाळींत रहाणे धोक्याचें आहे असा त्यांचा ठाम ग्रह झाला. त्यानीं हळूहळू इतर शेजाऱ्यांत या बातमीची लागण केली आणि लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाने सुट धरून सावध रहाण्याचे ठरविले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
JAYANT PRABHUNE
2 वर्षांपूर्वीMast