असं म्हणतात की चांगले बोलर्स चांगले बॅटस् मन घडवतात. हीच analogy साहित्यात आणायची म्हटली तर चांगले वाचकच चांगले लेखक घडवतात. आपण जे लिहितोय ते कोणीतरी जाणकार वाचणार आहे आणि तो जाणकार त्या लिखाणावर चांगल्याप्रकारे व्यक्तही होऊ शकतो हे लेखकाच्या लक्षात आले तर तो अधिक जबाबदारीने लिहितो. पूर्वीच्या काळी वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून असे गाजलेले वाद-प्रतिवाद आपल्याला आठवत असतील. अजूनही प्रगल्भ वाचक ज्या नियतकालिकांना मिळाला आहे ( किंवा त्यांनी मिळवला आहे आणि राखला आहे ) तिथे 'वाचकांचा प्रतिसाद' या सदराला संपादकीय इतकेच महत्व असते. लोकसत्ता आणि अंतर्नाद ही वानगीदाखल उदाहरणे आपण घेऊ शकतो. आपण पुनश्च काढण्याच्या मागचा हेतू भूतकाळातले 'काहीही' वर्तमानकाळातल्या 'कोणालाही' पाठवणे हा नव्हता. समाजातला हरवत चाललेला विवेक, ढासळत चाललेली मुल्यांवरची निष्ठा आणि या सगळ्यापायी येत चाललेलं सांस्कृतिक बकालपण यामुळे अस्वस्थ झालेल्या आमची 'पुनश्च' ही प्रतिक्रिया आहे. त्यामुळे लेखक, लेख आणि वाचक हे सगळेच 'निवडलेले' आहेत. आम्ही निवडलेले लेखक आणि लेख, त्याचे विषय तुमच्यासमोर आहेतच. त्यावर 'व्यक्त' होऊन आपण 'निवडलेले' वाचक आहोत हे सिद्ध करण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतोय. निमित्त आहे एका अभिनव स्पर्धेचं. लेखक व्यक्त होतो स्वान्तसुखाय म्हणूनच. पण त्याच्या लेखनाला पूर्णत्व येतं जेव्हा एखादा वाचक त्यावर आपली प्रतिक्रिया देतो. साद-पडसाद, ध्वनी-प्रतिध्वनी सारखं. ती प्रतिक्रिया लेखकाचे कौतुक करणारी असेल आणि तो सच्चा भाव त्यात प्रकट झाला असेल तर लेखकाला पुढचे लिहायला उत्साह येतो. ते कौतुक वरवरचं असेल तर लेखकाला त्याने काहीच फरक पडत नाही. आणि ती प्रतिक्रिया जर टीकात्मक असेल आणि केलेली टीका सकार ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rdesai
6 वर्षांपूर्वीअगदी बरोबर .पटलं बुवा !
Dilip Prabhakar Gadkari
7 वर्षांपूर्वी"स्त्री आत्मचरित्राचा मागोवा " स्त्री आत्मचरित्राचा मागोवा घ्यायचा झाला तर पहिल्या स्त्री आत्मचरित्रा पासून विचार करावा लागेल .१८७५ साली राससुंदरी या सामान्य स्त्रीने "आमार जीवन " या नावाने बंगाली भाषेत लिहिलेल्या आत्मचरित्राला प्राधान्य द्यावे लागेल .भारतीय भाषेत लिहिलेले ते पहिले आत्मचरित्र आहे .१९१० साली रमाबाई रानडे यांनी प्रकाशित केलेले आत्मचरित्र मराठी भाषेतील पहिले स्त्री आत्मचरित्र आहे . मराठीतील स्त्रियांची सुरवातीची आत्मचरित्र ही जवळ जवळ पतीचरीत्रच असायची .कालांतराने ती जोड चरित्र झाली .१९९० नंतर नवऱ्याशी असलेले भांडण ,दुरावा ,त्यांनी केलेली प्रतारणा अशा प्रकारची परखड आत्मचरित्र येऊ लागली .तर २००५ नंतरची आत्मचरित्र खऱ्या अर्थाने स्त्री आत्मचरित्र आहेत असे जाणकारांचे मत आहे . नागपूरच्या ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती माधुरी साकुळकर यांनी' भारतीय स्त्री शक्ती 'या संघटनेचे काम करतांना स्त्री जीवनाचा अभ्यास करण्यासाठी महिलांशी चर्चा करून दर आठवड्याला एका महीलेचे आत्मचरित्र लिहून दैनिक तरुण भारत मध्ये प्रसिध्द केले .या लेखनात विविधता होती .बारबाला ,सेक्सवर्कर ,मोलकरीण ,मजुरी करणाऱ्या महिलांपासून उच्च पदावर असणाऱ्या व विविध क्षेत्रात नामवंत असलेल्या महिला तसेच नामवंत पुरुषांच्या सहवासात असलेल्या परंतु स्वतः प्रकाशझोतात नसलेल्या महिलांची चरित्र वाचून त्याचा सारांश प्रकाशित केला .त्यात दुर्गा खोटे ,गिरीजा कीर ,सुलोचना चव्हाण ,लता मंगेशकर ,डॉ .अलका मांडके इत्यादि महिलांचा समावेश आहे . वाचकांच्या आग्रहाखातर श्रीमती माधुरी साकुळकर यांनी निवडक शम्भर आत्मचरित्राचे "तिची कथा "या नावाने एक पुस्तक पुस्तक प्रकाशित केले .नागपूरच्या 'लाखे प्रकाशन 'या संस्थेने ३१ मार्च २०१४ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे पुस्तक प्रकाशित केले .स्त्रियांची आत्मचरित्र म्हणजे स्त्री जीवनाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे .हे पुस्तक वाचताना वाचणार्याला आत्मिक बळ मिळते .प्रत्येक महिलेने हे वाचले तर पाहिजेच परंतु शक्य झाले तर आपले आत्मचरित्र लिहिले पाहिजे . दिलीप प्रभाकर गडकरी कर्जत -रायगड ९९७०१९७६६६
Dilip Prabhakar Gadkari
7 वर्षांपूर्वीकल्पना छान आहे . लिहिण्याऱ्यांनी लिहीत जावे वाचणाऱ्याने वाचत जावे वाचता वाचता एक दिवस लिहिणाऱ्याचे हात घ्यावेत दिलीप प्रभाकर गडकरी ९९७०१९७६६६
Shubhada Bodas
7 वर्षांपूर्वीलेखक वाचक स्पर्धेची संकल्पना फारच चांगली आहे. मी अगदी नवीन सभासद आहे. पण त्या वेळी तुम्ही दिलेला प्रतिसाद व सहकार्य ह्यावरून तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची कल्पना येते. तुम्हाला शुभेच्छा! ह्या सगळ्या घडामोडी मी खूप जवळून पाहिल्या आहेत.
Manisha Kale
7 वर्षांपूर्वीPharach Chan Kalpana.