निसर्गावर छोटासा विजय

पुनश्च    अरुण टिकेकर    2018-09-05 06:00:04   

अंक- निवडक कालनिर्णय

लेखाबद्दल थोडेसे : अरुण टिकेकर हे नाव वाचताच आपल्या मनावर गांभीर्याचा एक थर साचतो. त्यांनी लिहिलेला 'तारतम्य' हा स्तंभ आठवतो, 'स्थल-काल' सारखे सांस्कृतिक इतिहास सांगणारे सदर आठवते. ते जेव्हा 'तारतम्य' लिहित होते तेव्हा त्यातील प्रत्येक लेखाची सुरुवात  एखाद्या इंग्रजी  लेखकाच्या 'कोट'ने करायचे. तेव्हा 'हुश्श सापडला बुवा एक चांगला इंग्रजी उतारा, आता पुढे लिहितो' असा एक विनोद वृत्तपत्र क्षेत्रात प्रचलित झाला होता. टिकेकरांच्या लेखनाची प्रसन्न, हलकी फुलकी बाजू कालांतराने 'लेले आणि नेने' यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमधून पुढे आली. टिकेकर हे उत्तम ललित लेखक होते. परंतु हा लेखक कायम त्यांच्यातील संशोधकाआड दडून राहिला. प्रस्तुत लेखात  टिकेकरांमधला हा नर्मविनोदी लेखक वृद्धत्वाची चाहुल, निवृत्तीनंतरचे आयुष्य याकडे मजेनं बघत लिहिताना दिसतो. मन अगदी प्रसन्न करणारा हा लेख आहे- लेखक: अरुण टिकेकर ना.सी. फडक्यांनी ‘पहिला केस’ नावाचा लघुनिबंध  - त्यांच्या भाषेत गुजगोष्ट – लिहीपर्यंत वाढत्या वयाची नव्यानं जाणीव झालेल्यांच्या भावना मराठी विश्र्वात तरी अव्यक्त राहिल्या होत्या. तारुण्य संपत चालल्याचं सूचित करणारं चिन्ह म्हणजे डोक्यावरच्या झुलुपांचं विरळ होणं किंवा त्या काळ्याभोर पिकात कमीअधिक पांढरे केस आढळणं. कर्तृत्वाची ओढ तारुण्य कष्टप्रद बनवतं खरं, पण त्या कष्टांबरोबर अन्य जीवनानंदांचं सुखसुद्धा मिळवून देतं. जीवनानंद देणाऱ्या त्या अनुभवामुळे कष्ट हेसुद्धा अनोखं समाधान देत राहतात. समृद्धीकडे वाटचाल असेल तर तारुण्य हे काळभंगुर आहे याचा अंदाजसुद्धा सुरुवातीला येत नाही आणि वाटचाल खडतर असली तरी जागेची वा आर्थिक चणचण तारुण्यसुलभ भावभा

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कालनिर्णय , चिंतन

प्रतिक्रिया

  1. Suresh Kulkarni

      4 वर्षांपूर्वी

    शरीरी बनले की दुःख येणारच पण आपली खरी ओळख पटली अन आपण शरीर नाहीत हे कळलं तर कायम आनंदी आनंद साजरा करता येतो. मी शरीर नाही ,मी मनही नाही किंवा मी एक पवित्र आत्मा आहे मी एक पवित्र आत्मा आहे.यावरच दृढविश्वास वाढायला हवा.

  2. Shankar Junghare

      4 वर्षांपूर्वी

    खुप सुंदर लेख आहे

  3. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    अभ्यासपूर्ण लेख . मना करा रे प्रसन्न । सर्वसिद्धी चे कारण ॥ मन प्रसन्न असेल तर शरीर तरुण राहते . चांगले मार्गदर्शन मिळाले .

  4. vilasrose

      7 वर्षांपूर्वी

    लेख खूप आवडला.वाचन हा मोठा विरंगुळा आहे.

  5. shriramclinic

      7 वर्षांपूर्वी

    निरोगी शरीर आणि हाताला काम आवश्यक

  6. kisho

      7 वर्षांपूर्वी

    निवृत्ती नंतर आनंदी मनासाठी अरुण तीकेकारांचा लेख छान!! उत्तम लेख!!

  7. Monika

      7 वर्षांपूर्वी

    छान लेख. निवृत्ति नंतर पण आनंदी राहणे महत्वाचे ...

  8. asmitaph

      7 वर्षांपूर्वी

    छान लेख. धन्यवाद.

  9. sugandhadeodhar

      7 वर्षांपूर्वी

    सर्व आतरूण प्रौढानी वाचावे आणि वाढते वय ग्रेसफुली स्वीकारावे

  10. arya

      7 वर्षांपूर्वी

    खूपच छान हलका फुलका पण विचार करायला लावणारा आहे.सकाळ प्रसन्न झाली....

  11. SUSHYANAND

      7 वर्षांपूर्वी

    योगायोग असा कि निवृत्तीनंतर (साल २०११) खूप वाचायचे असे ठरवले होतेच परंतु नेमके त्याचवेळी श्री टिकेकर यांचे “अक्षरनिष्ठांची मांदियाळी” हे पुस्तक आणि श्री सतीश काळसेकर यांचे “वाचणाऱ्याची रोजनिशी” हि पुस्तकं वाचली आणि वाचनाला एक शिस्त लागली. त्याचवर्षी अभंग प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली आणि श्री संजय भास्कर जोशी यांनी संपादित केलेली “वाचकनिशी” हातात आली. त्यात रोज काय वाचले ते रोजनिशीत लिहायाचेच असे ठरवले. गेली पाच वर्षे नियमितपणे करीत आलो. कांही वाचले नसेल त्यादिवशी तसे लिहायचे. आता त्या जुन्या डायऱ्या काढून वाचतांना खूप मजा येते.

  12. manjiriv

      7 वर्षांपूर्वी

    मन आनंदी असलं तर शरीर आनंदी राहिलंच म्हणून समजायचं. उत्तम लेख.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts