अंक- प्रबुद्ध भारत (आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक), वर्ष- २७-१०-१९५६ लेखाबद्दल थोडेसे : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो अनुयायांसह केलेले धर्मांतर ही महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाला मोठी कलाटणी देणारी घटना होती. या घटनेचे चौफेर प्रतिसाद तेव्हा उमटले होतेच आणि आजही उमटत आहेत. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे भरलेल्या परिषदेत बाबासाहेबांनी धर्मांतराची पहिली घोषणा केली. माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसांकरिता आहे, असे सांगत त्यांनी या विषयावर दीर्घकाळ चिंतन केले व त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या सर्व काळात बाबासाहेबांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांमध्ये भाऊराव गायकवाड हे एक प्रमुख नाव होते. धर्मांतरानंतर त्याबाबतची भूमिका स्पष्ट करणारा, 'प्रबुद्ध भारत' च्या आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांकांत लिहिलेला हा लेख आहे. पुनश्र्चच्या पुढील वर्षाच्या वाटचालीत धर्मांतराच्या विविध पैलूंवर त्या काळात वृत्तपत्र-मासिकांमधून प्रसिद्ध झालेले लेख सदस्यांना देण्याचा मानस आहे व त्या दिशेने तयारी सुरु आहे. तूर्तास भाऊराव यांचा हा लेख आज देत आहोत. बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले भाऊराव उर्फ दादासाहेब हे नाशिकच्या ‘ज्ञानविकास केंद्र’ ह्या शिक्षणसंस्थेचे तसेच नागपूरच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते सदस्यही होते. प्रबुद्ध भारत ह्या साप्ताहिकाच्या संपादक मंडळाचेही ते अध्यक्ष होते. ते मुंबई राज्याच्या विधानसभेचे आणि नंतर स्वतंत्र भारतात लोकसभेचेही सदस ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
shailesh71
7 वर्षांपूर्वीसध्याची आजूबाजूची परिस्थिती पाहता धर्म बदलून सुद्धा समाज जोखडातून मुक्त झाला का हा प्रश्न अजून ही शिल्लक आहेच. राजकारणी मात्र स्वतःची पोळी व्यवस्थित भाजून घेत आहेत. पण त्यावेळच्या सवर्णांचे समर्थन मात्र मुळीच करता येणार नाही.
balpathak
7 वर्षांपूर्वीलेख वाचताना इंगळया डसत होत्याच पण सद्यस्थितीत दोन्ही ही धमर्मात सत्य काय दिसतय सूज्ञास अधिक सांगणे नलगे
bookworm
7 वर्षांपूर्वीधर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि असावी. काळानुरुप या संकल्पनेत बदल व्हायला पाहिजे होता. अधिकाधिक मानवाभिमुख व्हायला हवा होता. तत्कालीन सामाजिक परिस्थितीमुळे बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. या लेखातून ती अंगावर येते आणि बेफिकीर हिंदू समाजाचे वैषम्य वाटते.
Dilipvel
7 वर्षांपूर्वीThanks. I have succeeded in reading the article now.
Ravindra Adkar
7 वर्षांपूर्वीI am not able to read this article even after logging in with my password.
Namratadholekadu
7 वर्षांपूर्वीमाणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहेत ,हे जवळपास शंभर वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलंय, मात्र आजही समाज धर्माचे अंध पणाने पालन करत आहे. खरंच धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या अनेक घटना या लेखातून समजल्या . या विषयावर अधिक माहिती देणारे लेख आपण यापुढे देणार आहात, हे वाचून आनंद झाला. खूपच छान लेख!
deepa_ajay
7 वर्षांपूर्वीमुळ लेख नक्कीच विचार करायला लावणारा आहे, आज 2018 साली प्रश्न असा आहे की आपण जातीपाती उच्च नीच ह्या जोखडातून खरोखरच मुक्त झालोय का, आणि मुळात ज्यांनी एवढा गाजावाजा करून बौद्ध धर्म स्वीकारला त्यांना सुद्धा आपल्या जातीच्या जोखडातून मुक्त होता आलेले नाही,अजून बरच काही लिहिता येईल अर्थात एका गोष्टींचा निश्चित पणे निषेध केला पाहिजे ते म्हणजे त्यावेळेस सवर्ण हिंदूंचे वागणे